आ. श्वेता महाले

बळीराजाची व्यथा सर्वात मोठी,नौटंकी करणाऱ्या लोकांकडे ध्यान देऊ नका: आ. श्वेता महाले

MLA Shweta Mahale: चिखली विधानसभा मतदारसंघातील आमखेड येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिकांची झालेली बिकट अवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील

बळीराजाची व्यथा सर्वात मोठी,नौटंकी करणाऱ्या लोकांकडे ध्यान देऊ नका: आ. श्वेता महाले

MLA Shweta Mahale

 

मुंबईहून परतताच आ. श्वेता महाले शेतकऱ्याच्या बांधावर; आमखेडमध्ये पिकांची पाहणी

चिखली (MLA Shweta Mahale) : चिखली विधानसभा मतदारसंघातील आमखेड येथे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिकांची झालेली बिकट अवस्था आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार श्वेता महाले पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. मुंबईहून परतल्यानंतर वेळ न दवडता त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीला प्राधान्य देत आमखेड गाठले.

मुंबईहून परतताना मेहकर फाट्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार श्वेता महाले पाटील काही क्षण थांबल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावे, त्यांची व्यथा ऐकून घ्यावी, त्यांना धीर द्यावा आणि संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.

“आज बळीराजाची व्यथा सर्वात मोठी आहे. त्यामुळे इतर चिल्लर गोष्टींकडे व नौटंकी करणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना आधार देणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याला आश्वस्त करावे. सरकार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि या संकटात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा,” असे आवाहन आ. श्वेता महाले पाटील यांनी केले.

यानंतर आमदार श्वेता महाले पाटील यांनी थेट आमखेड येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. श्री. प्रल्हाद कडूबा वाघ यांच्या शेतावर जाऊन त्यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कृषी अधिकाऱ्यांकडून पिकांची सद्यस्थिती, पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती आणि संभाव्य नुकसानीबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिकांची झालेली अवस्था आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून आ. श्वेता महाले यांनी त्यांना धीर दिला. “शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. संकट कितीही मोठे असले तरी सरकार शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेणे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांची परिस्थिती जाणून घेत आहेत. शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणे, त्यांना दिलासा देणे आणि संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास देण्यासाठी राज्य शासनाकडून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला जात आहे. पंचनामे व आवश्यक मदतीबाबत शासनाकडून वेगाने कार्यवाही सुरू असून, शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन संवेदनशीलतेने काम करत आहे, असा विश्वास आ. श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केला.

चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवून त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या बांधावर जाऊन त्यांची व्यथा ऐकणे आणि संकटाच्या काळात त्यांना धीर देणे, यालाच सध्या सर्वाधिक प्राधान्य असल्याचे आ. श्वेता महाले पाटील यांनी सांगितले.

टैग्स: MLA Shweta Mahale

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी श्वेता महाले पालकमंत्र्यांसोबत बांधावर

MLA Shweta Mahale Patil: शेतकऱ्यांची व्यथा केवळ कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शासनापर्यंत पोहोचावी, यासाठी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत..

Sep 24, 2026
चिखलीत 'सुई-धाग्या'ची नवी राजकीय नांदी! 'ताई-भाऊ' यांची पहिलीच 'सार्वजनिक भेट'

चिखलीत 'सुई-धाग्या'ची नवी राजकीय नांदी! 'ताई-भाऊ' यांची पहिलीच 'सार्वजनिक भेट'

MLA Shweta Mahale-Patil: चिखली विधानसभा मतदारसंघात ज्या दोन प्रमुख नेत्यांच्या राजकीय संघर्षाची राज्यभर चर्चा असायची, त्या विद्यमान भाजप आमदारा श्वेताताई महाले-पाटील आणि माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे

Sep 20, 2026
पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

पिकं करपली, शेतकरी हवालदिल; श्वेता महाले पाटील आढावा बैठकीत भावनिक

MLA Shweta Mahale Patil: शेतकरी वर्षभर कष्ट करून पिकाची काळजी घेतो; मात्र ऐन उत्पादनाच्या काळात पावसाने दगा दिल्याने त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.पिकं करपली, शेतकरी हवालदिल

Sep 20, 2026
शिवरायांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार घेऊन देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आ. श्वेता महाले पाटील

शिवरायांच्या रयतेच्या कल्याणाचा विचार घेऊन देवाभाऊंचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी: आ. श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: “छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा विचार सदैव स्मरणात ठेवूनच देवाभाऊंचे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात जनतेला आधार

Sep 18, 2026