शेतकरी धान बोनस

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तात्काळ द्या; तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Farmer Paddy Bonus: महाराष्ट्र शासनाने धान बोनस नितांत तात्काळ शेतकऱ्यांना देण्याची मागणी युवक काँग्रेसने तहसिलदारांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्र्यांना सादर केली.

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तात्काळ द्या; तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Farmer Paddy Bonus

कन्हान (Farmer Paddy Bonus) : महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ हंगामा तील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर बोनस देण्याची घोषणा केली असतानाही शेतकऱ्यांना अद्याप बोनसची रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामुळे जाहीर करण्यात आलेला धान बोनस तात्काळ वितरित कर ण्यात यावा. या मागणीचे निवेदन रामटेक विधानसभा युवक काँग्रेस तर्फे तहसिलदार यांच्या मार्फत मा. मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना सादर करण्यात आले.

युवक काँग्रेसने स्पष्टपणे भूमिका मांडत धान उत्पादक शेतकरी हा राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा असुन शासनाने जाहीर केलेल्या बोनसची रक्कम अद्याप अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे (Farmer Paddy Bonus) शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने दिलेले आश्वा सन पाळत जाहीर करण्यात आलेला प्रति हेक्टर धान बोनस तात्काळ वितरित करावा तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता लाभ देण्यात यावा. “शेतकऱ्यांचा हक्काचा बोनस तात्काळ द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या !” अशी मागणी रामटेक विधान सभा युवक काँग्रेस तर्फे मा. तहसिलदारां मार्फत मा. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.

निवेदन निखिल दा. पाटील अध्यक्ष, रामटेक विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस व गौरव भोयर उपाध्य क्ष, नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस यांच्या नेतृत्वा त देण्यात आले. याप्रसंगी सचिन सोमकुवर, अभिषेक खंडाळे, आयुष मानकर, महेश धोंगडे, गौतम पाटील, राहुल चाफले, आर्यन गजभिये,  कल्पक मुलतेली, जय ढोबळे, शुभम वाघमारे, प्रज्वल मेश्राम, मयुर साबरे सह युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.