शेतकरी आत्महत्या

farmer committed suicide: गळफास घेऊन अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या..

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी देविदास शेळके यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्ज व नपिकीमुळे त्यांच्यावर ताण आला होता.

By : देशोन्नति
farmer committed suicide: गळफास घेऊन अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या..

बुलडाणा (farmer committed suicide) : तालुक्यातील चांडोळ येथील अल्पभूधारक शेतकरी देविदास दशरथ शेळके वय ५० वर्ष यांनी आपल्या राहत्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने आत्महत्या केल्याची घटना आज दि. १२ मार्च रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, चांडोळ येथील (farmer committed suicide) शेतकरी देविदास दशरथ शेळके यांनी आपल्या राहत्या घरात छताला गळफास लावून आत्महत्या केली. मागील काही महिन्यांपासून शेतीच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच महाराष्ट्र बँकेचे कर्जबाजारी असल्याने तो चिंतित राहत होता. घरात कोणीच नसल्याची त्याने संधी साधत छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मृतकाचे भाऊ रामदास शेळके यांनी धाड पोलिसात दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

तसेच मृतदेह शवविच्छेदणासाठी ग्रामीण रुग्णालय धाड येथे पाठविण्यात आले असून, पोलिसांनी मर्ग दाखल करण्यात आला आहे. सदर (farmer committed suicide) शेतकऱ्याजवळ चार एकर शेती आहे मात्र सततच्या नपिकी व एका पायाने अपंग असलेला शेतकरी त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. असल्याची चर्चा परिसरात होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भावंडे असा मोठा आप्त परिवार आहे.घटनेचा पुढील तपास धाड पोलिस करीत आहे.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026