लातूर रानभाजी महोत्सव

लातूर येथे भव्य रानभाजी महोत्सव!

Latur Vegetable Festival:

लातूर येथे भव्य रानभाजी महोत्सव!

Latur Vegetable Festival

लातूर (Latur Vegetable Festival) : रानभाज्यांचे मानवी आरोग्यातील महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांचा प्रसार करणे तसेच त्यांच्या विक्रीसाठी एक सक्षम विपणन साखळी निर्माण करणे या मुख्य उद्देशाने कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ या वर्षाकरिता विशेष रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा रानभाजी महोत्सव बुधवारी, २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत लातूर शहरातील औसा रोडवरील दत्त मंदिराशेजारील कल्पतरु मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

या (Latur Vegetable Festival) महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महोत्सवामध्ये दुर्मीळ रानभाज्या आणि रानफळांची वैशिष्ट्ये, त्यांचे औषधी गुणधर्म, आरोग्यासाठी होणारे उपयोग, रानभाज्यांच्या संवर्धन पद्धती आणि पारंपरिक पाककृती (रेसिपी) यांची सचित्र व तांत्रिक माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

तसेच या (Latur Vegetable Festival) महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या व रानफळे थेट खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. लातूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे रानभाज्या व रानफळे उपलब्ध आहेत, त्यांनी ही उत्पादने महोत्सवात विक्रीसाठी सोबत आणावीत; कृषी विभागामार्फत त्यांना विक्री व्यवस्थापनाची योग्य सोय उपलब्ध करून दिली जाईल. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक बंधू-भगिनींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रानभाज्यांची माहिती जाणून घ्यावी व रानभाज्यांची खरेदी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि 'आत्मा'चे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

राजाटोला येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षण संपन्न

राजाटोला येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षण संपन्न

 तालुक्यातील मौजा राजाटोला येथे दिनांक १९ जून २०२६ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (DSAO) मा. प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

Jun 20, 2026