सध्या केळी बागा आहेत कमी
आखाडा बाळापूर (Banana-growing farmers) : सध्या बाजारपेठेत केळी मागणी वाढत आहे यामुळे केळीला माल पाहून चांगला भाव मिळत आहे. यामुळे केळी बागा तयार असणारे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. दरम्यान सध्या कळमनुरी तालुक्यात व शेजारच्या वसमत तालुक्यात केळी बागा कमी आहे. आणखीन एक महिन्यात नंतर केळी बागा विक्री करता सुरू होतील असे केळी उत्पादक शेतकरी सांगतात.
मागीलवर्षी व या नंतर यंदाही वादळी वार्यामुळे केळी बागा पट्टा (Banana-growing farmers) असलेल्या बागायती भागात कळमनुरी व वसमत तालुक्यात केळी बागेचे अतोनात नुकसान झाले होते.केळी बागा तयार झाल्यानंतर विक्रीसाठी तयार असताना निसर्गाच्या चक्रामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता.इतर भागात ही नुकसान झाले होते नुकसान झाले मात्र नुकसान तुलनेत मागीलवर्षी अत्यंत तुटपुंजी मदत मिळाली होती यंदा अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही आहे. दरम्यान यानंतर आता मागील अनेक दिवसांपासून केळी मागणी वाढत गेली केळी मागणीनुसार आवक नसल्याने केळी 'भाव' खाऊ लागली.मध्यंतरी भाव चांगलेच वधारले होते सध्या हैद्राबाद, चंदींगड, दिल्ली व अमृतसर इतरत्र माल जात आहे अडीच हजार आत बाहेर भाव मिळत आहे तर विदेशात एक्स्पर्ट होणारी केळी आधी तीन हजारांवर गेली होती सध्या अठ्ठावीस ते तीन हजार आत बाहेर विदेशात जाण्यासाठी दर्जेदार केळी भाव मिळत आहे असं केळी व्यावसायीक ज्ञानेश्वर वीर यांनी शनिवारी सांगितले. नवीन केळी बागा पंधरा वीस दिवसांत आवक सुरू होऊ शकते.
केळी बागा शेतकरी भरमसाठ खर्च व रात्रंदिवस राबराब राबून जोपासतो मागील सलग दोन वर्षे वादळीवार्यामुळ केळी बागा नुकसान झाले आहे. यापुर्वीही नुकसान झाले होते परंतु प्रत्यक्षात नुकसान भरपाई अत्यल्प मिळाली.शासनाने केळी बागा नुकसान झाले तर नुकसान तुलनेत वाढीव मदत देण्यासाठी ठोस पावले उचलावीत. यंदा सध्या केळी आवक कमी, मागणी आहे यामुळे अनेक वर्षांनंतर प्रथमच चांगला भाव मिळत आहे बाहेर देशात जाणारे दर्जेदार केळी कधी नव्हे एवढा वाढीव भाव मिळत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी समाधानी आहे.नवीन बागा येणार्या केळीला वाढीव भाव मिळावा, भाव पडू नये यासाठी शासनाने प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे.
-कैलास पाटील साळुंखे, केळी उत्पादक शेतकरी दांडेगाव ता.कळमनुरी