हिंगोली (Heat Stroke Farmer Death) : जिल्ह्यातील वसमत तालुक्यात उष्णतेने आणखी एका तरुण शेतकर्याचा बळी घेतला आहे. रांजोना येथील ३१ वर्षीय गजानन मुरलिधर साळवे यांचा २१ मे गुरूवार रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेतात नांगरणी करताना उष्माघाताने मृत्यू (Heat Stroke Farmer Death) झाला. गेल्या आठवडाभरापासून ते पेरणीपूर्व मशागतीसाठी रोज सकाळपासून शेतात राबत होते.
गुरुवारी दुपारी ४२ अंशावर पोहोचलेल्या उन्हातही नांगरणी सुरू असताना अचानक चक्कर येऊन गजानन जमिनीवर कोसळले. आजूबाजूच्या शेतकर्यांनी तातडीने त्यांना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. गजानन यांच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे. हिंगोलीत सध्या सकाळी दहापासून रात्री सातपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत असून दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. असे असतानाही पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकरी उन्हात काम करत आहेत. या (Heat Stroke Farmer Death) घटनेने जिल्ह्यातील उष्माघात बळींची संख्या तीनवर पोहोचली आहे. चांदू साळवे यांनी दिलेल्या माहितीवरून हट्टा पोलिसांनी शनिवारी दुपारी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून जमादार संदीप चव्हाण तपास करत आहेत.
उष्माघात शेतकरी मृत्यू
रांजोना येथे उष्णतेचा कहर; ३१ वर्षीय शेतकर्याचा शेतातच मृत्यू
Heat Stroke Farmer Death: हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी गजानन मुरलिधर साळवे यांचा २१ मे २०२४ रोजी शेतात काम करताना उष्माघाताने मृत्यू झाला.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Heat Stroke Farmer Death