बासंबा () : हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे खरीप हंगाम २०२६ मधील कोरड्या दुष्काळाने नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यासाठी तहसील कार्यालय हिंगोलीचे पथक दाखल झाले. पथक प्रमुख नायब तहसीलदार वडवळकर यांच्यासह ग्रामस्तरीय समितीचे ग्रामपंचायत अधिकारी नीलकंठ ढोके, ग्राममहसूल अधिकारी सय्यद अब्दुल, सहाय्यक कृषी अधिकारी रेखा पिंपरे, महसूल सहाय्यक मुस्ताक शेख यांनी शेत शिवारात जाऊन पाहणी केली.
यावेळी सरपंच गंगाबाई बांगर, दशरथ पवार, अंकुश बांगर, बाळू बनसोडे, मदन ढाले, योगेश घुगे, भास्कर घुगे, दिनकर शेषराव ढाले, माधवराव ठेंगडे इत्यादी नागरिक उपस्थित होते. बासंबा गावातील खरीप हंगामातील शंभर टक्के पीक (Basamba farmland Kharif crop) दुष्काळाने पूर्णतः नुकसान झाले आहे, असा अहवाल शासनाला पाठवला जाईल, असे आश्वासन पथक प्रमुख नायब तहसीलदार वडवळकर यांनी दिले.