मॉस्को (Russia drone attack) : युक्रेनने रशियाच्या तातारस्तान प्रांतातील निझनेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका बालकासह 13 जणांचा मृत्यू झाला, तर 39 जण जखमी झाले. हल्ल्यात औद्योगिक परिसरासह कामगारांच्या वसतिगृहाला फटका बसला. मृतांमध्ये उझबेकिस्तानच्या सात नागरिकांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रारंभी या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 13 झाली. (Russia drone attack) हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य ‘तातनेफ्ट’ कंपनीचे ‘टॅनेको’ तेलशुद्धीकरण केंद्र होते. हे केंद्र मॉस्कोपासून सुमारे 800 किलोमीटर पूर्वेला असून, रशियाच्या प्रमुख तेलप्रक्रिया केंद्रांपैकी एक आहे.
ड्रोनचा काही भाग जवळच्या वसतिगृहावर कोसळल्याने तेथे राहणाऱ्या नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हल्ल्यानंतर परिसरात मोठी आग लागली आणि आकाशात धुराचे लोट पसरले. तातारस्तान प्रशासनाने मृतांच्या स्मरणार्थ दुखवटा जाहीर केला आहे. (Russia drone attack) युक्रेनने तेलशुद्धीकरण केंद्रावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. रशियाच्या युद्धक्षमतेला आर्थिक आणि इंधन पुरवठ्याच्या पातळीवर धक्का देण्यासाठी ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. रशियाने या घटनेला ‘दहशतवादी हल्ला’ ठरवत चौकशी सुरू केली आहे.
रशिया ड्रोन हल्ला
रशियाच्या तेलशुद्धीकरण केंद्रावर ड्रोन हल्ला
Russia drone attack: युक्रेनने रशियाच्या तातारस्तान प्रांतातील निझनेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका बालकासह 13 जणांचा मृत्यू झाला, तर 39 जण जखमी झाले. हल्ल्यात औद्योगिक परिसरासह कामगार
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Russia drone attack