Vikram-1

भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राची ऐतिहासिक झेप; स्कायरूटच्या 'विक्रम-1'चे यशस्वी प्रक्षेपण

भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.

भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राची ऐतिहासिक झेप; स्कायरूटच्या 'विक्रम-1'चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटातून सकाळी ११.३० वाजता उड्डाण; 'आगमन' मोहिमेत उपग्रह यशस्वीपणे लो-अर्थ ऑर्बिटमध्ये, खासगी स्पेस उद्योगासाठी महत्त्वाचा टप्पा
 

श्रीहरिकोटा : भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या 'विक्रम-1' या ऑर्बिटल श्रेणीतील रॉकेटचे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. नियोजित उड्डाणानंतर रॉकेटने सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करत त्यावरील उपग्रह योग्य कक्षेत (ऑर्बिट) स्थापित केला. त्यामुळे भारतातील खासगी कंपनीच्या ऑर्बिटल रॉकेट कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जात आहे.

सकाळी सुमारे ११.३० वाजता 'विक्रम-1'चे प्रक्षेपण करण्यात आले. संपूर्ण मोहिमेदरम्यान इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बारकाईने निरीक्षण ठेवले होते. या मिशनला 'आगमन' असे नाव देण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी नियोजनानुसार यशस्वीरीत्या पार पडली.

ही मोहीम केवळ स्कायरूट एरोस्पेसपुरती मर्यादित नसून, भारतातील वाढत्या खासगी अंतराळ उद्योगासाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. २०२० मध्ये केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्रात सुधारणा करत खासगी कंपन्यांसाठी रॉकेट निर्मिती, उपग्रह विकास आणि प्रक्षेपण सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि संशोधनाला चालना मिळाली आहे.

यापूर्वी २०२२ मध्ये स्कायरूट एरोस्पेसने 'विक्रम-S' या सब-ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी उड्डाण केले होते. मात्र त्या मोहिमेत उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला नव्हता. यावेळी 'विक्रम-1' हे रॉकेट पृथ्वीपासून सुमारे ४५० किलोमीटर उंचीवरील लो-अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये विविध लहान उपग्रह पोहोचवण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. ही तीन नियोजित मोहिमांपैकी पहिली मोहीम असून, त्यानंतर या रॉकेटचा नियमित व्यावसायिक प्रक्षेपणासाठी वापर करण्याची तयारी केली जाणार आहे.

ऑर्बिटल रॉकेट म्हणजे काय?

सब-ऑर्बिटल आणि ऑर्बिटल रॉकेटमध्ये मूलभूत फरक आहे. सब-ऑर्बिटल रॉकेट अवकाशाच्या सीमेपर्यंत जाऊन पुन्हा पृथ्वीवर परत येते. त्याउलट, ऑर्बिटल रॉकेट उपग्रहाला आवश्यक वेग देऊन पृथ्वीभोवतीच्या निश्चित कक्षेत स्थिरपणे फिरण्यासाठी सक्षम बनवते. 'विक्रम-1'चे मिशन पूर्णपणे यशस्वी ठरल्यास, पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह यशस्वीरित्या पोहोचवणारी भारतीय खासगी कंपनी म्हणून स्कायरूट एरोस्पेसची ऐतिहासिक नोंद होणार आहे.

'विक्रम-1'ची प्रमुख वैशिष्ट्ये

'विक्रम-1' हे चार टप्प्यांचे (Four-Stage) रॉकेट आहे. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये Solid Fuelचा वापर करण्यात आला आहे, तर चौथ्या टप्प्यात Liquid Fuelवर चालणारे इंजिन बसविण्यात आले आहे. गरजेनुसार हे इंजिन पुन्हा सुरू करता येत असल्याने उपग्रह अचूक कक्षेत स्थापित करणे अधिक सुलभ होते. हे रॉकेट विशेषतः लहान उपग्रहांच्या व्यावसायिक प्रक्षेपणासाठी तयार करण्यात आले आहे.

या मोहिमेच्या यशामुळे भारतातील खासगी अंतराळ उद्योगाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भविष्यात भारतातून अधिक व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचा मार्ग या यशामुळे अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.

संबंधित सामग्री

बिबट्याच्या कातडीसह दोघे ताब्यात; मोहनटोला परिसरात रचला सापळा

बिबट्याच्या कातडीसह दोघे ताब्यात; मोहनटोला परिसरात रचला सापळा

Deori Leopard Skin Seized: वन्यजीव तस्करीच्या विरोधात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर प्रादेशिक युनिटने देवरी परिसरात मोठी कारवाई करत बिबट्याची कातडी जप्त केली आहे.

Sep 29, 2026
तळणी-लिंगदरी शिवारात आढळले बिबट्याच्या पायाचे ठसे

तळणी-लिंगदरी शिवारात आढळले बिबट्याच्या पायाचे ठसे

Leopard paw prints: हिंगोलीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या तळणी शिवारातील लिंगदरी फाट्याच्या मागील परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे..

Sep 23, 2026
वरखेडमध्ये बिबट्याची दहशत: रात्रीची वीज बनली शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी

वरखेडमध्ये बिबट्याची दहशत: रात्रीची वीज बनली शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारी

Varkhed Leopard Terror: पावसाने दिलेली ओढ आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे विहिरीतील उपलब्ध पाण्यावर सोयाबीन व इतर पिकांना जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

Sep 21, 2026
इस्रोचा इशारा...चक्रीवादळाचा धोका उंबरठ्यावर

इस्रोचा इशारा...चक्रीवादळाचा धोका उंबरठ्यावर

Indian Cyclone: ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तीन तीव्र चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे इस्रोच्या अभ्यासातून समोर आले आहे. इस्रोच्या संशोधकांनी मागील सुमारे चार दशकांतील समुद्र..

Sep 16, 2026
इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

चिखली तालुक्यातील इसरूळ परिसरातील शिवारात वाघ किंवा बिबट्यासदृश हिंस्र वन्यप्राण्याचा वावर असल्याच्या चर्चेने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sep 05, 2026