उपग्रह भूकंप संकेत

भूकंपाचा 85 दिवस आधीच मिळणार इशारा..

Satellite Earthquake Signal: भूकंपाचा अचूक अंदाज वर्तवणे आजवर विज्ञानासमोरील मोठे आव्हान मानले जाते. मात्र, उपग्रहांच्या माहितीचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भूकंपाच्या संभाव्य धोक्याचे संकेत

भूकंपाचा 85 दिवस आधीच मिळणार इशारा..

Satellite Earthquake Signal

उपग्रहांच्या माहितीचा आणि AI चा वापर; पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांचा अभ्यास

नवी दिल्ली () : भूकंपाचा अचूक अंदाज वर्तवणे आजवर विज्ञानासमोरील मोठे आव्हान मानले जाते. मात्र, उपग्रहांच्या माहितीचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भूकंपाच्या संभाव्य धोक्याचे संकेत काही आठवडे आधी मिळवण्याच्या दिशेने संशोधन सुरू आहे. युरोपियन अंतराळ संस्थेच्या ‘स्वार्म’ उपग्रहांमधून मिळालेल्या माहितीच्या अभ्यासातून (Satellite Earthquake Signal) भूकंपाच्या सहा ते 85 दिवस आधी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र आणि आयनमंडलात असामान्य बदल आढळू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

भूगर्भातील विवर्तनिक पट्ट्यांवर मोठा ताण निर्माण झाल्यानंतर त्याचा परिणाम केवळ जमिनीपुरता मर्यादित राहत नाही. या प्रक्रियेमुळे वातावरण आणि आयनमंडलातही विद्युत, चुंबकीय आणि औष्णिक बदल होऊ शकतात. (Satellite Earthquake Signal) पृथ्वीचे भूकवच, वातावरण आणि आयनमंडल यांच्यातील या परस्परसंबंधाला ‘लिथोस्फियर-अॅटमॉस्फियर-आयनोस्फियर कपलिंग’ असे म्हटले जाते.

उपग्रह टिपणार भूगर्भातील संकेत
भूगर्भातील हालचालींमुळे निर्माण होणारे बदल आयनमंडलातील इलेक्ट्रॉन घनता आणि चुंबकीय क्षेत्रात दिसू शकतात. शेकडो किलोमीटर उंचीवर फिरणारे उपग्रह हे बदल टिपू शकतात. जमिनीवरील संवेदकांकडून मिळणाऱ्या माहितीबरोबरच हा उपग्रह डेटा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तपासल्यास संभाव्य (Satellite Earthquake Signal) भूकंपाच्या धोक्याचे नमुने ओळखण्यास मदत होऊ शकते.