नवी दिल्ली (PM Modi Video Removed) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरील एक महत्त्वाचा व्हिडिओ अचानक गायब झाल्याने मोठी चर्चा सुरू झाली. हा व्हिडिओ हटवण्यात आल्याने विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र, प्रकरणाची दखल घेत Meta ने स्पष्टीकरण देत हा प्रकार कोणत्याही कायदेशीर आदेशामुळे किंवा धोरणाच्या उल्लंघनामुळे नव्हे, तर तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे सांगितले.
28 जुलैला व्हिडिओ अचानक गायब
23 जुलै रोजी अपलोड करण्यात आलेल्या या (PM Modi Video) व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि तरुणांना संबोधित केले होते. परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कायदे करण्याबाबत त्यांनी भाष्य केले होते. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. मात्र, 28 जुलैच्या सकाळी तो फेसबुकवर उपलब्ध नसल्याचे आढळून आले.
PM Modi releases a video and says “More strict actions against paper leaks to come in tomorrow’s Cabinet!"
— ANI (@ANI) July 23, 2026
Prime Minister Narendra Modi says, "... Numerous effective measures have been taken in the past two and a half months since the paper leak incident. The culprits have been… pic.twitter.com/Hw0u0ChZww
'कायदेशीर निर्बंध'चा संदेश दिसल्याने वाद
व्हिडिओ (PM Modi Video) उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही युजर्सना "कायदेशीर विनंतीमुळे या मजकुरावरील प्रवेश मर्यादित करण्यात आला आहे" असा संदेश दिसल्याचे सांगण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आणि या प्रकाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
Meta releases a statement on blocking PM Modi's video on Facebook.
— ANI (@ANI) July 28, 2026
"The content was removed in error and has since been restored." says a Meta Spokesperson. pic.twitter.com/SZ082SY5kw
Meta चे स्पष्टीकरण
Meta ने या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना, व्हिडिओ (PM Modi Video) हटवण्यामागे कोणताही कायदेशीर आदेश किंवा धोरणाचे उल्लंघन नसून, तो तांत्रिक त्रुटीचा परिणाम असल्याचे स्पष्ट केले.
सरकारकडून माहिती मागवण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सरकारकडून दखल घेण्यात आली असून, संबंधित परिस्थितीची माहिती घेण्यासाठी Meta च्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले जाऊ शकते. तसेच या (PM Modi Video) घटनेची सविस्तर चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.