Jantar Mantar Protest

जंतर-मंतर आंदोलनात नवा ट्विस्ट; सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले, अभिजीत दीपकेंचा अटकेचा दावा

दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात शुक्रवारी महत्त्वाची घडामोड घडली.

जंतर-मंतर आंदोलनात नवा ट्विस्ट; सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले, अभिजीत दीपकेंचा अटकेचा दावा

Jantar Mantar Protest

'आज संध्याकाळी आम्हाला अटक होऊ शकते'; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात शुक्रवारी महत्त्वाची घडामोड घडली. २८ जूनपासून उपोषणावर असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके यांनी त्यांच्या टीमला आज अटक होऊ शकते, असा दावा करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतला.

याचवेळी जंतर-मंतरवर आंदोलन सुरू ठेवणारे अभिजीत दीपके यांनी गंभीर दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या कार्यकर्त्यांना आज संध्याकाळी अटक केली जाऊ शकते, अशी माहिती त्यांना मिळाली आहे. त्यांनी समर्थकांना कोणत्याही परिस्थितीत शांतता राखण्याचे आणि आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू ठेवण्याचे आवाहन केले.

अभिजीत दीपके यांनी सांगितले की, सरन्यायाधीश आणि सरकारी प्रतिनिधी यांची आज बैठक होणार असून, त्यापूर्वीच अटकेची शक्यता असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे या दाव्यामुळे आंदोलनाच्या पुढील घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.

दीपके म्हणाले, "कॉक्रोच जनता पार्टीच्या टीमला अटक होऊ शकते, अशी माहिती मला नुकतीच मिळाली आहे. आम्ही गेल्या ३५ दिवसांपासून येथे पूर्णपणे शांततेने आंदोलन करत आहोत. स्वतंत्र भारतात इतक्या शांततेने आंदोलन झाल्याची उदाहरणे फार कमी असतील. मग आम्हाला अटक करण्याचे कारण काय?"

पुढे बोलताना त्यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या विचारांवर आपली भूमिका आधारित असल्याचे सांगितले. "आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करत आहोत. अशा परिस्थितीत आम्हाला अटक करण्यामागचे कारण सरकारने स्पष्ट करावे," अशी मागणी त्यांनी केली.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका दीपके यांनी पुन्हा स्पष्ट केली. "जंतर-मंतरवरील आंदोलन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत सुरूच राहील. सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांहून अधिक काळ उपोषण केल्यानंतर ते संपवल्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचे जीवन देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे," असेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीबाबत बोलताना दीपके म्हणाले की, ही बैठक तटस्थ ठिकाणी होणार असून, "धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आम्हाला मान्य नाही," अशी भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026