बिझनेसमन आणि इन्फ्लुएन्सर राकेश त्रेहान यांचा दावा; iPhone 17 किंवा त्यापुढील मॉडेल्सचे वाटप करण्याची तयारी
पंजाबमध्ये लवकरच ‘iPhone Langar’ आयोजित केला जाणार असल्याच्या घोषणेने चर्चेला उधाण आले आहे. पंजाबमधील बिझनेसमन आणि इन्फ्लुएन्सर राकेश त्रेहान यांनी २२ सप्टेंबर रोजी हा उपक्रम घेण्याची घोषणा केली आहे. या ‘लंगर’मध्ये गरजू किंवा उपस्थित लोकांना आयफोन मोफत देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
राकेश त्रेहान यांच्या माहितीनुसार, या उपक्रमासाठी जवळपास १००० आयफोनचा ऑर्डर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वाटप करण्यात येणारे मोबाइल फोन हे iPhone 17 किंवा त्यापेक्षा पुढील मॉडेल्स असतील, असा दावा त्यांनी केला आहे.
‘iPhone Langar’मागे काय कारण?
या अनोख्या उपक्रमामागील कारण सांगताना राकेश त्रेहान यांनी धार्मिक अनुभवाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, माता राणी त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्या त्यांच्या स्वप्नात आल्या होत्या.
माता राणीने आपल्याला आयफोनचे वाटप करण्यास सांगितले, असा दावा त्रेहान यांनी केला आहे. त्यानंतर २२ सप्टेंबरला ‘iPhone Langar’ आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
१००० आयफोन वाटपाचा दावा
या घोषणेनुसार, जवळपास १००० आयफोन लोकांना मोफत देण्याची तयारी करण्यात आली आहे. हे फोन iPhone 17 किंवा त्यापुढील श्रेणीतील असल्याचे त्रेहान यांनी म्हटले आहे. त्यामुळे पंजाबमधील या अनोख्या ‘iPhone Langar’ची सध्या चर्चा सुरू झाली आहे.