नवी दिल्ली (Indian soldiers martyred) : रशियन सैन्यात भरती झालेल्या 227 भारतीय नागरिकांपैकी 51 जणांचा मृत्यू झाला असून, 139 जणांना सैन्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रशियात अद्याप सैन्यात कार्यरत असलेल्या भारतीयांची सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किर्गिस्तान दौऱ्यादरम्यान सोमवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रशियात कार्यरत असलेल्या उर्वरित भारतीयांच्या सुटकेसाठी रशियन सरकारशी सातत्याने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मॉस्कोतील भारतीय दूतावासही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय नागरिकांची रशियन सैन्यातून (Indian soldiers martyred) सुटका हा मुद्दा पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या चर्चेतही उपस्थित करण्यात आला आहे.
भारताने यापूर्वीही रशियाकडे (Indian soldiers martyred) भारतीय नागरिकांना सैन्यातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर एजंट तसेच विविध माध्यमांतून काही भारतीय नागरिक रशियन सैन्यात दाखल झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
भारतीय सैनिक शहीद
रशियन सैन्यात 227 भारतीयांपैकी 51 सैनिकांचा मृत्यू
Indian soldiers martyred: रशियन सैन्यात भरती झालेल्या 227 भारतीय नागरिकांपैकी 51 जणांचा मृत्यू झाला असून, 139 जणांना सैन्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रशियात अद्याप सैन्यात कार्यरत
By :
देशोन्नती डिजीटल »
•
Indian soldiers martyred
टैग्स:
Indian soldiers martyred