Indian Politicsv

‘अमित शाह यांना उपपंतप्रधान व्हायचंय, मोदींचा नकार’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

‘अमित शाह यांना उपपंतप्रधान व्हायचंय, मोदींचा नकार’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मोदी-शाह यांच्यात मतभेद असल्याचा राऊतांचा आरोप; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरही निवडणूक आयोगावर निशाणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मतभेद असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अमित शाह यांना देशाचे उपपंतप्रधान तसेच नरेंद्र मोदी यांचे वारसदार म्हणून घोषित व्हायचे होते; मात्र मोदींनी त्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

संसदेतील अमित शाह यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित करताना राऊत यांनी हा दावा केला. अमित शाह यांना संसदेत येण्यापासून कोणी अडवले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोदी आणि शाह यांच्यात मतभेद असल्याचे सांगत, शाह यांनी तातडीने उपपंतप्रधानपदाची मागणी केल्याचे राऊत म्हणाले.

आपल्याला मोदींचा वारसदार म्हणून घोषित करण्याची तसेच देशाच्या उपपंतप्रधानपदी नियुक्त करण्याची मागणी अमित शाह यांनी केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. मात्र, नरेंद्र मोदी यांनी ही मागणी स्पष्टपणे फेटाळल्याचेही ते म्हणाले. ‘आपण सांगत असलेली माहिती १०० टक्के सत्य आहे’, असा दावा राऊत यांनी केला.

संसदेच्या कामकाजावरूनही भाजपवर निशाणा

संसदेतील कामकाजाच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. सर्व खासदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा आणि शिस्त कायम ठेवली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. भाजप स्वतःला शिस्त आणि नैतिकतेचे पालन करणारा पक्ष म्हणून मांडतो, त्यामुळे त्यांच्याकडूनही त्याच निकषांची अपेक्षा असल्याचे राऊत म्हणाले.

चर्चेपासून कोणीही दूर जाऊ नये, असे सांगत त्यांनी अमित शाह यांच्या संसदेत अनुपस्थित राहण्यावरही निशाणा साधला. यावेळी राऊत यांनी भाजपवर उपरोधिक टिप्पणी करत सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर राऊतांचा आरोप

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही संजय राऊत यांनी भाष्य केले. या प्रकरणाची घटनापीठासमोर दुपारी 12 वाजता सुनावणी होणार असून, ती पुढील दिवसापर्यंत सुरू राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडलेला युक्तिवाद महत्त्वाचा असल्याचे राऊत यांनी नमूद केले. विधिमंडळ पक्षातील गट विकत घेण्याची प्रवृत्ती वाढल्यास त्याचा परिणाम थेट संविधानावर होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

शिवसेना पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली असून त्यांच्या हयातीतच पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्यानुसार पक्षाच्या घटनेत बदल करून त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचे राऊत म्हणाले. असे असतानाही निवडणूक आयोगाची भूमिका घटनाबाह्य असल्याचा आरोप त्यांनी केला.

निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

निवडणूक आयोग अमित शाह यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसशी संबंधित पक्षांच्या प्रकरणांचा दाखला देत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पक्षांच्या फुटीमागे ‘सेटिंग-बेटिंग’ असल्याचा आरोप करत राऊत यांनी आतापर्यंत चार पक्ष विकले गेल्याचे आणि या संपूर्ण प्रक्रियेत 5,000 कोटी रुपयांचा बाजार झाल्याचा दावा केला. अखेरीस संविधानाचा विजय होईल आणि निर्णय आपल्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित सामग्री

‘लोकांचं मनोरंजन करता करता मीच ड्रामा झालो’; कोर्टात राजपाल यादव भावुक; १.१५ कोटी जमा, उर्वरित ८५ लाखांसाठी मुदत

‘लोकांचं मनोरंजन करता करता मीच ड्रामा झालो’; कोर्टात राजपाल यादव भावुक; १.१५ कोटी जमा, उर्वरित ८५ लाखांसाठी मुदत

चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादवांनी सुप्रीम कोर्टात १.१५ कोटींचा डिमांड ड्राफ्ट दिला. उर्वरित ८५ लाखांसाठी कोर्टाने दोन आठवड्यांची मुदत दिली.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026