कार्यालयाच्या भिंतींवर काळा रंग फवारला; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध, लवकरच एफआयआर
पंजाबमधील संगरूर येथे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुख्य कार्यालयावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर कार्यालयाच्या भिंतींवर काळा रंगही फवारण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
Sangrur, Punjab: A petrol bomb was hurled at the BJP office causing panic in the area. No casualties were reported. Police have launched an investigation and examining CCTV footage to identify the attackers, and have assured strict legal action against those responsible pic.twitter.com/xLJjRwr5Ui
— IANS (@ians_india) July 27, 2026
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कार्यालयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसर सुरक्षा कवचात घेतला. आरोपींचा माग काढण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून शहरात नाकेबंदी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Sangrur, Punjab: Petrol bomb attack targets BJP office; no injuries reported. Police launch investigation and scan CCTV footage
— IANS (@ians_india) July 27, 2026
SP Davinder Attri says, "...The case is being investigated thoroughly from every possible angle, and strict legal action will be taken against those… pic.twitter.com/R1awiIM0bb
संगरूरचे एसपी-डी दविंदर अत्री यांनी डीएसपी आणि संगरूरचे एसएचओ यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक तपासात पेट्रोलने भरलेल्या बिअरच्या बाटलीचा वापर करून पेट्रोल बॉम्ब तयार करण्यात आल्याचे समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले.
तपासाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले जात असून या प्रकरणातील दोषींविरुद्ध एफआयआर नोंदवून कठोर कारवाई केली जाईल, असे अत्री यांनी स्पष्ट केले. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.