ज्वेलर्स दुकान चोरी

मानोरा येथील ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न फसला!

Jewelers shop theft: मानोरा शहरातील डिग्रस चौक येथील शहाणे ज्वेलर्स दुकानात अज्ञात ४ चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरच्या साहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना

मानोरा येथील ज्वेलर्स दुकानात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न फसला!

Jewelers shop theft

गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न!
४ चोरटे पांढऱ्या स्कॉर्पिओतून पसार, गुन्हा दाखल! 

मानोरा (Jewelers shop theft) : मानोरा शहरातील डिग्रस चौक येथील शहाणे ज्वेलर्स दुकानात अज्ञात ४ चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरच्या साहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दुकान मालकाच्या भावाने वेळीच धाव घेतल्याने चोरट्यांना पळ काढावा लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठी नगर, मानोरा येथील रहिवासी व डिग्रस चौकातील ज्वेलर्स व्यावसायिक यांचे सोने-चांदी खरेदी-विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाला लागूनच त्यांच्या मालकीचा आणखी एक गाळा असून त्यात वेगळी खोली आहे. त्या खोलीत दोन लोखंडी तिजोऱ्या ठेवल्या होत्या, ज्यात दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने ठेवले जात होते.  दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते.

तर मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे लहान भाऊ गोपाल शहाणे यांना दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कोणतेही दृश्य दिसत नसल्याने संशय आला. त्यांनी दुकानाकडे धाव घेतली असता, त्यांच्या आवाजाने दुकानातून ४ लोक शटरमधून बाहेर पळत आले. त्यापैकी ३ जण दुकानासमोर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून पसार झाले, तर एक जण त्यांच्या गाडीमागे पळत जाऊन डिग्रस चौकामध्ये जाऊन गाडीत बसला. दुकानात जाऊन पाहणी केली असता, बाहेरील शटरच्या लॉकच्या पट्ट्या तोडलेल्या, आतील लहान शटरचे कुलूप तुटलेले, तर गोदरेज कंपनीच्या तिजोरीचे लॉक आणि की-होल गॅस कटरने जाळल्याचे दिसून आले.

घटनास्थळी एक इंडेन कंपनीचा गॅस सिलेंडर, एक मोठा ऑक्सिजन सिलेंडर ज्याला लाल व निळ्या रंगाच्या नळ्या जोडून गॅस कटर तयार केले होते, तसेच एक प्लास्टिक मुठ असलेला लोखंडी कोयता आढळून आला. या प्रकरणी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

आधी दर्शन अन् मग दानपेटीवर हात साफ!

आधी दर्शन अन् मग दानपेटीवर हात साफ!

Sai Temple Theft Case: आधी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घ्यायचे आणि त्यानंतर लगेच मंदिराची दानपेटी फोडून रोकडसह मौल्यवान ऐवज लंपास करायचा, असा धक्कादायक प्रकार

Jul 20, 2026
परभणीतील जिंतुरात घरफोडी...दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

परभणीतील जिंतुरात घरफोडी...दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

Jintur Burglary Case: जिंतुरातील घरफोडीच्या घटनेत, देवदर्शनासाठी यांच्या तुळजापूरला गेल्यानंतर अनोळख्या चोरांनी २.५ लाखांचा मुद्देमाल खाली लावलेला आहे.

Jun 15, 2026