कुरुंदा जुगार अड्डा

कुरुंदा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना अटक; २.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kurunda Gambling Den: हिंगोलीमध्ये कुरुंदा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना अटक केली गेली, २.७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

कुरुंदा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांना अटक; २.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kurunda Gambling Den

हिंगोली (Kurunda Gambling Den) : जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत एका मोठ्या जुगार अड्ड्याचा (Kurunda Gambling Den) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ९ जुगारींना अटक करण्यात आली असून, एकूण २ लाख ७८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या पथकाने ३१ मार्च २०२६ रोजी ही कारवाई केली. कुरुंदा शिवारातील आबासाहेब देशमुख यांच्या शेतातील आखाड्यासमोर 'झन्ना मन्ना' नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याधारे पथकाने छापा टाकून ९ जणांना रंगेहाथ पकडले. 

यामध्ये  आबासाहेब केशवराव देशमुख, गंगाधर रखमाजी खंदारे, ज्ञानेश्वर मारोती खंडागळे, बंडू लक्ष्मण कांबळे, मारोती लक्ष्मण काळे, सय्यद मुस्तफा सु. मुनीर, राहुल नागोराव गायकवाड, खंडुजी तुकाराम गुहाडे आणि संतोष केरबा दळवी सर्व राहणार कुरुंदा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून  या छाप्यात पोलिसांनी ७ मोबाईल फोन, ४ मोटारसायकली, २३,७०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २,५४,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मटका जुगारावरही कारवाई करण्यात आली.  याच मोहिमेदरम्यान गिरगाव येथील बसस्थानकावर तुकाराम उत्तमराव कर्‍हाळे (रा. गिरगाव) हा 'कल्याण बाजार' नावाचा मटका जुगार (Kurunda Gambling Den) खेळत असताना आढळला. त्याच्याकडून १,३०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या (Kurunda Gambling Den) दोन्ही प्रकरणांत कुरुंदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, शिवाजी जालमिरे, साईनाथ कंठे, हरीभाऊ गुंजकर, ज्ञानेश्वर गोरे, नरेंद्र साळवे आणि आकाश टापरे यांच्या पथकाने केली आहे. जिल्ह्यात यापुढेही अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026