परभणी चोरी घटना

परभणीत चोरीच्या घटना वाढल्या; संशयीतांची धरपकड

Parbhani Theft Crime: परभणीतील शेतकरी समुदायावर चोरांचे धोका वाढला आहे. पोलिसांनी संशयीतांना ताब्यात घेऊन पकडून गुन्हा दाखल करण्यात आले.

परभणीत चोरीच्या घटना वाढल्या; संशयीतांची धरपकड

Parbhani Theft Crime

 

परभणी पोलिसांची जिल्हाभरात कारवाई गुन्हे दाखल

परभणी (Parbhani Theft Crime) : जिल्ह्यात मागील काही दिवसात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शेत आखाड्यावरील साहित्य, बंद असलेली घरे चोरटे लक्ष करत आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी परभणी पोलिसांनी विशेष मोहिम राबवत संशयीतांना ताब्यात घेतले आहे. अंधाराचा फायदा घेत दबा धरुन बसलेल्या संशयीतांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्यात नितीन रुस्तुम चव्हाण, चारठाणा पोलीस ठाण्यात प्रदीप प्रभाकर घुगे, नागोराव दासू मोहिते, गंगाखेड पोलीस ठाण्यात नितीन शिवाजीराव साळवे, सचिन संतोष जगताप, जिंतूर पोलीस ठाण्यात पवन आश्रोबा वाकळे, माऊली अंबादास नागरे, मानवत पोलीस ठाण्यात भय्यासाहेब सर्जेराव तुपसुंदरे, नवा मोंढा पोलीस ठाण्यात मोहम्मद रिहान मोहम्मद इरफान, डॅनियल सचिन पाल,  नानलपेठ पोलीस ठाण्यात सोनू वैâलास कांबळे, पाथरी पोलीस ठाण्यात मोहम्मद बीन पारेस अबुद हांतोश,  मनवर सरवर कुरेशी, शेख खलील शेख शादुल्ला, मोहम्मद हाजी मोहम्मद रियाजोद्दिन, सेलू पोलीस ठाण्यात संभाजी आबासाहेब भाबट, दत्ता कुंडलिक भाबट, श्रीकांत मुंजा हेडवे, गणेश बाबासाहेब मुळे, अभिजीत दिपक लिपणे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर व्यक्ती संशयीतरित्या अंधाराचा फायदा घेत आपले अस्तित्व लपवून बसलेले मिळून आले. संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी योग्य समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गंगाखेड, सेलुत चोरीच्या वाहनासह दोघे ताब्यात
परभणी :
गंगाखेड आणि सेलू पोलीस ठाणे हद्दित पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयीतांना चोरीच्या वाहनासोबत ताब्यात घेण्यात आले. सेलू पोलीस ठाणे हद्दित सातोना रोडवर ज्ञानेश्वर राजेभाऊ निर्वळ याला पकडण्यात आले. तर गंगाखेड पोलीस ठाणे हद्दित दत्त मंदिर परिसरात निवरेश रतन साळवे याला एका वाहनासह पकडण्यात आले. संबंधित व्यक्तींकडे वाहनांबाबत योग्य माहिती नव्हती.

संबंधित सामग्री

अवैध धंद्यावरील कारवाईत पोलीस ठाण्यांची धडाकेबाज कारवाई, पण एलसीबीला मात्र 'ठावठिकाणा' लागेना  

अवैध धंद्यावरील कारवाईत पोलीस ठाण्यांची धडाकेबाज कारवाई, पण एलसीबीला मात्र 'ठावठिकाणा' लागेना  

Illegal business Action: जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांनी अवैध धंद्यांविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे जिल्ह्यातील अवैध दारू, मटका, वाळू तस्करी आणि जुगारावर कारवाईचा धडाका सुरू

Aug 20, 2026
तिखाडी येथील झन्ना मन्ना जुगारावर छापा; दहा जुगार्‍यांवर गुन्हा दाखल

तिखाडी येथील झन्ना मन्ना जुगारावर छापा; दहा जुगार्‍यांवर गुन्हा दाखल

Tikhadi Gambling Raid: तालुक्यातील तिखाडी येथे बासंबा पोलिसांनी झन्ना मन्ना जुगारावर छापा मारून १० जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून १८ हजार ७४० रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Aug 19, 2026
झारखंडमध्ये आंदोलक विद्याथ्यावर पोलिसांकडून लाठीमार; अश्रुधूर आणि पाण्याचा मारा, काही आंदोलक जखमी

झारखंडमध्ये आंदोलक विद्याथ्यावर पोलिसांकडून लाठीमार; अश्रुधूर आणि पाण्याचा मारा, काही आंदोलक जखमी

Jharkhand Paper Leak Case: झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात सोमवारी हजारो विद्यार्थी आणि नोकरीच्या इच्छुकांनी राजधानी रांचीमध्ये जोरदार आंदोलन केले. विविध मागण्या घेऊन आंदोलक..

Aug 10, 2026
लातूर पोलिसांच्या कामगिरीत जिल्ह्यातील १७ ठिकाणचे जनावर चोरीचे गुन्हे उघड

लातूर पोलिसांच्या कामगिरीत जिल्ह्यातील १७ ठिकाणचे जनावर चोरीचे गुन्हे उघड

Latur Police Action: शेतकर्‍यांच्या कष्टाने जोपासलेल्या जनावरांवर डल्ला मारून कत्तल करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला, कारवाईत लातूर जिल्ह्या..

Aug 07, 2026
जिल्हा वकील संघाकडून जंतरमंतर आंदोलनाला पाठिंबा

जिल्हा वकील संघाकडून जंतरमंतर आंदोलनाला पाठिंबा

Lawyers Union Andolan: जिल्हा वकील संघाने नवी दिल्लीतील जंतरमंदर येथे घडलेल्या लाठीचार्जविरुद्ध चळवळीला पाठिंबा देताना केंद्रीय मंत्रालयात अनेक मागण्या व्यक्त केली आहेत.

Jul 24, 2026