परभणी घरफोडी प्रकरण

परभणीत दिवसाढवळ्या घरफोडी;चार लाखाची रोकड लंपास

Parbhani burglary case: रामकृष्ण नगरात दिवसाढवळ्या घरफोडीमुळे अनोळखी चोरट्यांनी घरातील 4 लाख रुपयांची रोकड लंपास केली. घटना शुक्रवार, 29 मे रोजी घडली. रामेश्वर झंवर ने तक्रार दिली.

परभणीत दिवसाढवळ्या घरफोडी;चार लाखाची रोकड लंपास

Parbhani burglary case

 

परभणी शहरातील रामकृष्ण नगरातील घटना; नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल

परभणी (Parbhani burglary case) : शहरातील रामकृष्ण नगरात दिवसाढवळ्या घरफोडी करत अनोळखी चोरट्यांनी चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवार २९ मे रोजी सकाळी पावणे दहा ते रात्री आठ या दरम्यान घडली. सदर प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वर झंवर यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे नेहमीप्रमाणे मेडिकल दुकानावर गेले होते. रात्री आठ वाजता दुकान बंद करुन रामकृष्ण नगर येथील घरी आले असता त्यांना घराचे चॅनल गेट उघडे दिसले. आत जावून पाहणी केल्यावर त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली चार लाख रुपयांची रोकड दिसली नाही. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नवा मोंढा पोलिसांना याची माहिती दिली. अनोळखी चोरट्यांनी दिवसाढवळ्या (Parbhani burglary case) घरफोडी करत रोख रक्कम लंपास केली आहे. तपास पोनि. मांजरमकर करत आहेत.