परभणी गोवंश चोरी प्रकरण

परभणीत चारचाकीचा अपघात अन् गोवंश चोरी उघड

Parbhani cattle theft case: रधाव वेगातील कार चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी होऊन अपघात झाला. या वाहनात दोन गोवंश जनावरे होती. चौकशीत ही जनावरे चोरीची असल्याचे पुढे आले आहे.

परभणीत चारचाकीचा अपघात अन् गोवंश चोरी उघड

Parbhani cattle theft case

 

परभणी- पाथरी राष्ट्रीय महामार्गावर किन्होळा खरवडे शिवाराजवळील घटना

ताडबोरगाव (Parbhani cattle theft case) : भरधाव वेगातील कार चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी होऊन अपघात झाला. या वाहनात दोन गोवंश जनावरे होती. चौकशीत ही जनावरे चोरीची असल्याचे पुढे आले आहे. अपघाताची ही घटना गुरुवार २४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिस शिपाई शंकर लक्ष्मण जाधव हे कर्तव्यावर असताना डायल ११२ वर कॉल आला.

किन्होळा खरवडे शिवारात एका चारचाकीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले असता त्यांना कारमध्ये दोन जनावरे तर गाडीच्या बाजूला एक जण जखमी अवस्थेत आढळला. संबंधिताची चौकशी केली असता त्याने आपले नाव मुद्दसीर कुरेशी असे सांगितले. जनावरांविषयी विचारणा केली असता संबंधिताने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर पशुधन चोरीचे असल्याचे पुढे आले. अधिक चौकशी केल्यावर जखमी सोबत असलेले इतर सहकारी पळून गेल्याचे समजले. (Parbhani cattle theft case) पोलिसांनी या कारवाईत एक कार आणि दोन जनावरे मिळून जवळपास सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोउपनि. विश्वजीत रोडे अधिक तपास करत आहेत.