पूर्णा नगराध्यक्ष चोरी

परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यासमोरच माजी नगराध्यक्षांच्या घरात धाडसी चोरी

Purna Theft Crime: पूर्णा शहरात शुक्रवार रात्री नगराध्यक्ष स्व. सुभाषसिंग ठाकूर यांच्या घरात कुलूप तोडून अज्ञात चोरांनी १ लाख २८ हजार रुपयांची रोकड डकैती केली.

परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यासमोरच माजी नगराध्यक्षांच्या घरात धाडसी चोरी

Purna Theft Crime

 

कुलूप तोडून १ लाख २८ हजारांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल

परभणी (Purna Theft Crime) : पूर्णा शहरात चोरट्यांनी पोलिसांनाच थेट आव्हान दिल्याची घटना शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली. पूर्णा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या दिवंगत माजी नगराध्यक्ष स्व. सुभाषसिंग ठाकूर यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच ही घरफोडी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील ठाकूर कुटुंबीय बाहेरगावी असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील दोन खोल्यांमधील चार कपाटांचे कुलूप तोडून त्यातील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. शनिवार ८ ऑगस्ट रोजी सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पूर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पूजा सुभाषसिंग ठाकूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यासह व्यापारी प्रतिष्ठाने व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही चोरट्यांनी एवढ्या निर्भीडपणे घरफोडी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.