परभणी हत्या प्रकरण

परभणीच्या धानोरा येथे पतीने केली पत्नीची निर्घृणपणे हत्या

Parbhani murder case: गुरुवारी धानोरावर पत्नीला लोहपट्टीने मारण्याचा हत्या करावा या आरोपाने पळून गेलेल्या मुलभागी गजानन ज्ञानेश्वर आणि त्यांचा कुटुंब फरार आहे.

परभणीच्या धानोरा येथे पतीने केली पत्नीची निर्घृणपणे हत्या

Parbhani murder case

आरोपी पतीसह परिवार फरार; बोरी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू

परभणी (Parbhani murder case) :  जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या धानोरा देवगाव येथे पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून ठार मारल्याची घटना गुरुवार २५ जून रोजी घडली. दारू पिण्यासाठी पैसे किंवा सोन्याची पोत देत नसल्याने  पतीने हे खून केल्याची गावात चर्चा आहे. मयत महिलेच्या नातेवाईकांकडून या घटनेचा संताप व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद ची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत चालू होती. 

बोरी येथून जवळच असलेल्या धानोरा देवगाव या गावातील आरोपी गजानन ज्ञानेश्वर कुटे (वय ४४ वर्षे) हा त्याची पत्नी व दोन मुलांसह राहत होता. काही कारणामुळे गुरुवार २५ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याचा पत्नीसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन गजानन कुटे याने पत्नी मीराच्या डोक्यात लोखंडी रॉडचा घालून तिचा खून केला. परिसरात मोठ्या किंकाळ्या व आवाज आल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले परंतु मीराचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. मिराला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून लोक सुद्धा चक्रावून गेले. यानंतर मयताचे पार्थिव बोरी ता. जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून मृत झाल्याचे घोषित केले.  घटनेची माहिती मिळताच हिंगोली जिल्ह्यातील सेलसुरा ता. कळमनुरी येथील मयताचे आई-वडील, भाऊ व इतर नातेवाईक यांनी बोरी येथे येऊन रुग्णालयात धाव घेतली. रडण्याच्या आवाजाने रुग्णालय व परिसरात वातावरण भावूक झाले होते. दरम्यान स. पो. नि. रामेश्वर धोंडगे यांनी धानोरा देवगाव येथे घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून व तपास कामाला सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक एस एन थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शेख वसीम, राजेश जटाळ, विशाल लाड, श्रीराम दंडवते, सय्यद दिशाण, ज्ञानेश्वर कुटे हे पोलीस कार्यवाहीचे काम पाहत आहेत. दरम्यान मयत मिरा ह्या तीन दिवसापूर्वीच माहेर शेमसुरा ता. कळमनुरी येथे मुक्कामी आल्या होत्या. सर्वांची भेट घेतली होती. त्यांची ही भेट शेवटची ठरली.

नातेवाईकांचा मृतदेह घेण्यास नकार 
आमच्या मुलीची हत्या करणारा आरोपी गजानन कुटे याला जोपर्यंत अटक होत नाही; तोपर्यंत आम्ही मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, अशी ठाम भूमिका शेमसुरा ता. कळमनुरी येथील मयत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली आहे.