माळराना जुगार छापा

माळराना वरील जुगारावर छापा; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तिघे फरार

Malrana Gambling Raid: आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वारंगाफाटा बिट अंतर्गत मौजे भोसी येथील माळरानावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा टाकला.

माळराना वरील जुगारावर छापा; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तिघे फरार

Malrana Gambling Raid

 

१ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

आखाडा बाळापूर (Malrana Gambling Raid) : आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वारंगाफाटा बिट अंतर्गत मौजे भोसी येथील माळरानावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी सायंकाळी छापा टाकला. पोलिसांना पाहताच तिघे जण पळून गेले तर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकूण १ लाख ५० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस अधीक्षक डॉ. श्रेनिक लोढा आणि पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, संतोष नागरगोजे, प्रशांत शिंदे, पिराजी बेले, अरविंद जाधव, विठ्ठल जाधव आणि परमेश्वर सरकटे यांच्या पथकाने भोसी शिवारातील माळावर ही कारवाई केली.  छाप्यादरम्यान धम्माजी विठ्ठल भालेराव रा. उमरी ता. अर्धापूर जि. नांदेड, बाळू रामराव पवार रा. झुनझुनवाडी ता. कळमनुरी, शिवाजी माधवराव मुटकुळे रा. सुकळी विर ता. कळमनुरी, विश्वास अंबादास राजगोरे रा. गिरगाव ता. वसमत आणि रंगराव शिवाजी राठोड रा. झुनझुनवाडी ता. कळमनुरी या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

 त्यांच्यासोबत असले इतर तीन जण पोलिसांना पाहून माळावरून पळून गेले.  पोलिस जमादार संतोष नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून नमूद तारीख वेळी व ठिकाणी आरोपी गोलाकार बसून पैसे लावून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १ लाख ५० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते यांनी दिली. पोलिस पथकाने भोसी शिवारातील माळावर जुगार अड्ड्यावर छापा टाकताच जुगार खेळणारे पळू लागले. पोलिसांनी त्यांचा माळावरून पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले तर तिघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026