उदगीर अवैध सावकारी

अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

Udgir Illegal Money Lending: उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना अवैध सावकारी व्यवहाराच्या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने सोमवारी (५ ऑक्टोबर) मोठी कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४

अवैध सावकारीच्या संशयावरून उदगीरमध्ये छापा; कोरे बाँड, कोरे चेकसह हिशोबाच्या वह्या जप्त

Udgir Illegal Money Lending

उदगीर (Udgir Illegal Money Lending) : उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना अवैध सावकारी व्यवहाराच्या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाने सोमवारी (५ ऑक्टोबर) मोठी कारवाई केली. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १६ अंतर्गत सहकार विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने मिनी उद्योग भवनजवळ राहणाऱ्या सुधीर जगन्नाथ पारसेवार यांच्या घरी झडती व तपासणी केली.

या (Udgir Illegal Money Lending) कारवाईदरम्यान कथित अवैध सावकारी व्यवहाराशी संबंधित संशयित कोरे बाँड, कोरे चेक, व्याजाचे उल्लेख असलेल्या हिशोबाच्या वह्या तसेच खरेदी-विक्रीच्या दस्तऐवजांच्या प्रती पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे पुढील तपास केला जाणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण आणि जिल्हा उपनिबंधक विष्णुपोतांगळे यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.

तहसीलदार राम बोरगावकर तसेच उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी प्रशासकीय मदत केली. दरम्यान, अवैध सावकारी करणाऱ्यांची माहिती सहकार विभागाकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.