आरडीएक्स बॉम्ब धमकी

टपाल कार्यालय आरडीएक्स बॉम्बने उडविण्याची धमकी

RDX bomb threat: हिंगोलीच्या टपाल कार्यालयाला आलेल्या आरडीएक्स बॉम्बने उडविण्याच्या ई-मेल धमकीनंतर तपासणी व सतर्कता वाढली.

टपाल कार्यालय आरडीएक्स बॉम्बने उडविण्याची धमकी

RDX bomb threat

हिंगोलीत खळबळ: सर्तकतेच्या दृष्टीने बॉम्ब शोधक व नाशक पथकासह श्वान पथकाने केली तपासणी

हिंगोली (RDX bomb threat) : राज्यातील सर्व पासपोर्ट व टपाल कार्यालयात बुधवारी दुपारच्या  सुमारास सायनॉईड विषारी वायुमिश्रीत १६ आररडीएक्स बाँम्बद्वारे उडविण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याने हिंगोलीतील टपाल  कार्यालयात अलर्ट देऊन बाँम्बशोधक व नाशक पथकाने संपुर्ण परिसराची पाहणी केली.

या बाबत मिळालेली माहिती अशी  की, राज्यातील टपाल कार्यालयाना २५ मार्च बुधवार रोजी एक ई-मेल  प्राप्त झाला. तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट व टपाल कार्यालयात दुपारी १२.१० मिनिटांनी सायनॉईड विषारी  वायुमिश्रीत १६ आरडीएसक्स बाँम्बचा स्पोर्ट (RDX bomb threat)  होणार आहे. त्यामुळे  टपाल  कार्यालयातील सर्वांना तातडीने बाहेर काढा असे ई-मेल नमुद  केले होते. हा ई-मेल आल्याने बर्‍याच टपाल कार्यालयात एकच खळबळ उडाली. या बाबतची माहिती पोलिस  यंत्रणेला देण्यात आली.

त्याच निमित्ताने हिंगोली  शहरातील डाक विभागाच्या मुख्य कार्यालयात  तात्काळ   हिंगोली  शहर  पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  संदिप मोदे, जमादार अशोक धामणे, गणेश  लेकुळे, शेख  मुजीब, संतोष  करे, गणेश वाबळे, संजय मार्वेâ, पोलिस  उपनिरीक्षक नागरे, रवि गंगावणे, अभिजीत हलगे, गंगाधर राऊत, माधव मुटकुळे,  रोहित मुदीराज, प्रविण बांगर, दहशतवाद विरोधी  शाखेचे अमित मोडक, फुलाजी सावळे, विशाल घोळवे, दहशतवाद विरोधी पथक नांदेड  विभागाचे रवि धाबे, शेख मुजीब , डिएसबीचे गजानन निर्मले, संजय तोडेवाले आदी कर्मचार्‍यांचे पथक तात्काळ घटनास्थळी धडकले.  या ठिकाणी डाक विभागाच्या इमारतीसह संपुर्ण परिसराची बाँम्बशोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाद्वारे करण्यात आली. या दरम्यान  कुठेही आक्षेपार्ह बाब आढळून आली नसल्याचे पोलिस  सुत्राने सांगितले. त्यामुळे नागरीकांना कुठेही कोणतीही संशयीत वस्तू अथवा काही  बाब  आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिस  यंत्रणेला  द्यावी तसेच कोणत्याही अफवांवर नागरीकांनी  विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हा  पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ  रोहन यांनी केले आहे.

आरडीएक्सने राज्यातील पासपोर्ट व टपाल कार्यालय उडवून देण्याबाबतचा ई मेल आल्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली. हा मेल कोणी पाठविला व कोठून पाठविला. याबाबत उच्चस्तरावर तपास सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

टपाल कार्यालय तात्काळ केले रिकामे

राज्यातील पासपोर्ट व टपाल कार्यालय सायनॉईड विषारी वायु मिश्रीत १६ आरडीएक्स बॉम्बव्दारे उडविण्याच्या धमकीचा ई - मेल येताच पोलिस यंत्रणाही तात्काळ अर्लट झाली. हिंगोलीच्या टपाल कार्यालयात हिंगोली शहर पोलिसांसह बॉम्ब शोधक (RDX bomb threat) व नाशक पथक, दहशतवाद विरोधी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे पथक जाताच त्यांनी तात्काळ टपाल कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना बाहेर येण्याच्या सूचना दिल्या. पोस्ट मास्तर एस. एस. निर्मल यांच्यासह कर्मचार्‍यांनी तात्काळ टपाल कार्यालय खुले केले. त्यानंतर या पथकाने संपूर्ण डाक विभागाची व परिसराची पाहणी केली.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026