कळमनुरी (Kalmanuri Theft Crime) : शहरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या हातातील ५० हजार रुपयांची थैली हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा (जा.) ता. कळमनुरी येथील शेतकरी भाऊराव चिरमाडे यांनी दिनांक १३ मे रोजी Bank of India शाखा कळमनुरी येथून ५० हजार रुपये काढले होते. बँकेतून पैसे काढल्यानंतर त्यांनी ती रक्कम एका थैलीमध्ये ठेवून बाहेर पडताच काही अंतरावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील (Kalmanuri Theft Crime) थैली हिसकावून पळ काढला.
घटना घडल्यानंतर भाऊराव चिरमाडे यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांची चौकशी केली असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. शहरातील गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या (Kalmanuri Theft Crime) घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता या चोरट्यांचा शोध लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.