कोरची दारू विक्री गुन्हा

तालुक्यात सुगंधित तंबाखू व दारूची खुलेआम तस्करी; प्रशासन झोपेत की संगनमतात?

Korchi liquor Sale: गडचिरोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग खरोखर कार्यरत आहेत का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात सुगंधित तंबाखू व दारूची खुलेआम तस्करी; प्रशासन झोपेत की संगनमतात?

Korchi liquor Sale

कोरची ( Korchi liquor Sale) : गडचिरोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग खरोखर कार्यरत आहेत का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कारण तालुक्यात सध्या सुगंधित तंबाखू व दारूची खुलेआम तस्करी सुरू असून संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणावर (Korchi liquor Sale) सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करून ती तालुक्यात दुप्पट दराने विकली जात आहे. राज्यात या पदार्थावर स्पष्ट बंदी असतानाही तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात चार-पाच दुकाने उघडपणे हा माल विकताना दिसत आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संशयाची सुई आर्थिक हितसंबंधांकडे वळत आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे, स्थानिक पोलिसांकडूनही या बेकायदेशीर व्यवसायाकडे डोळेझाक केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तस्करांचे मनोबल वाढले असून ते निर्भयपणे हा धंदा चालवत आहेत. दुसरीकडे, दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध होत असल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावागावांत खुलेआम दारू विक्री होत असताना कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

दरम्यान, नव्याने नियुक्त अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन जिल्ह्यात सुरू असलेली भेसळ, तस्करी व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, या (Korchi liquor Sale) बेकायदेशीर व्यवसायात बाहेरील राज्यातील काही हिंदी भाषिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचीही चर्चा असून, स्थानिक प्रशासनाने याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गडचिरोलीसारख्या संवेदनशील जिल्ह्यात कायद्याची पायमल्ली होत असताना संबंधित यंत्रणा निष्क्रिय राहणार का? की आता तरी ठोस कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना नसलेल्या लॅब जवळा बाजारात सुरू

इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना नसलेल्या लॅब जवळा बाजारात सुरू

Indian Medical Association: रक्त तपासणी करणार्‍या आठ मेडिकल लॅब कार्यरत असून बहुतेक जणांकडे इंडियन मेडिकल असोसिएशनचा मान्यताप्राप्त परवाना नसताना रक्त तपासणीचा गोरख धंदा सुरू

Aug 12, 2026
लातूरमध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

लातूरमध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

Latur Doctors' Protest: होमिओपॅथी (बीएचएमएस) पदवीधर आणि मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या सरकारच्या विचाराधीन प्रस्तावाला विरोध

Aug 04, 2026
दिवसा ढवळ्या ज्येष्ठ महिलेचा मंगळसूत्र हिसकावला; नानलपेट हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

दिवसा ढवळ्या ज्येष्ठ महिलेचा मंगळसूत्र हिसकावला; नानलपेट हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

Parbhani mangalsutra stolen: परभणीत, नानलपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेचा मंगळसूत्र हिसकावला. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

Apr 29, 2026
जिल्हा आयपीएलचे बेटिंग 'हब'

जिल्हा आयपीएलचे बेटिंग 'हब'

२८ मार्चपासून यंदाच्या आयपीएल क्रिकेट हंगामाचा बिगुल वाजला असून, क्रिकेटच्या या उत्सवासोबतच जिल्ह्यात सट्टेबाजीचा बाजारही तेजीत आला आहे.

Mar 30, 2026