बुलढाणा पोलिस सर्जिकल स्ट्राइक

बुलढाणा पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राइक

Buldhana Police: बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याबाबत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तक्रार केल्यानंतर, पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली

बुलढाणा पोलिसांचा अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राइक

Buldhana Police

 

एकाच आठवड्यात २.१५ कोटींचा मुद्देमाल जप्त, १५३ आरोपींवर कारवाई

​चिखली (Buldhana Police) : बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याबाबत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी तक्रार केल्यानंतर, पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दलाने गेल्या आठवडाभरात अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत तब्बल २ कोटी १५ लाख ६७ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेत विविध गुन्ह्यांत १५३ आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

​आगामी महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्याचे (Buldhana Police) पोलिसांच्या विशेष प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

​झालेल्या कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे:
अवैध दारू कारवाई: अवैध देशी, विदेशी आणि गावठी हातभट्टी दारूविरुद्ध ७६ गुन्हे दाखल करून ७६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३,९२,१८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जुगार कारवाई: जुगार ॲक्टनुसार २१ केसेस नोंदवून ६३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून २,९९,३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आर्म ॲक्ट (बेकायदेशीर शस्त्रे): आर्म ॲक्ट अंतर्गत २ केसेस दाखल करून ४ आरोपींना अटक केली. आरोपींकडून १ पिस्तुल, १ मॅगझिन, १ चाकू, १ कोयता, २ मोटरसायकल व १ मोबाईल असा एकूण १,८६,३०० रुपयांचा ऐवज जप्त झाला.
NDPS Act (अवैध गांजा): गांजा बाळगणाऱ्यांविरुद्ध २ कारवाया करून २ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५८,५०० रुपये किमतीचा १.१७० कि.ग्रॅ. गांजा जप्त करण्यात आला.
अवैध गौण खनिज (रेती चोरी): रेती चोरीच्या ४ केसेसमध्ये ८ आरोपींना वाहनांसह ताब्यात घेऊन तब्बल २,०६,३१,००० रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
​

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभरात एकूण १०५ गुन्हे दाखल करत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील ही मोहीम यापुढेही अशीच तीव्र रीतीने सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

संबंधित सामग्री

भाजपचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’; 100 आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता!

भाजपचा मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’; 100 आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता!

BJP Surgical Strike: उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारीच्या तयारीला वेग दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील धक्क्यातून धडा घेत पक्ष यावेळी उमेदवार निवड

Oct 04, 2026
बुलढाण्यात भाजप नगरसेवकावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा

बुलढाण्यात भाजप नगरसेवकावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा

बुलढाणा शहरातील कारंजा चौकात भाजप नगरसेवक आकाश दळवी यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Sep 10, 2026
धाड पोलिसांची तत्पर कारवाई; धामणगाव येथील मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघड

धाड पोलिसांची तत्पर कारवाई; धामणगाव येथील मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा अवघ्या दोन तासांत उघड

Dhad Police Raid: बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथे श्री गजानन महाराज साईबाबा संस्थानातील दानपेटीच्या चोरीतून एकूण ₹7,500 चोरी झाली. तापासावर पोलिसाने आरोपी निलेश गणेश माहाले अटक

Jul 27, 2026
गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश, जनतेचा ठाणेदार म्हणून मिळविला विश्वास; धाडचे ठाणेदार API प्रताप दत्तात्रय भोस यांची बदली

गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश, जनतेचा ठाणेदार म्हणून मिळविला विश्वास; धाडचे ठाणेदार API प्रताप दत्तात्रय भोस यांची बदली

धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रताप दत्तात्रय भोस यांची नुकतीच बदली झाली.

Jul 04, 2026
​​​​​​​पोलीस प्रशासनाविरोधात शिवसेनेचे आमरण उपोषण; पोलीस अधीक्षकांच्या चौकशीची मागणी!

​​​​​​​पोलीस प्रशासनाविरोधात शिवसेनेचे आमरण उपोषण; पोलीस अधीक्षकांच्या चौकशीची मागणी!

Shiv Sena Hunger Strike: जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि कथित ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या निषेधार्थ शिवसेना, धर्मवीर युथ फाऊंडेशन आणि विविध सामाजिक संघटना आमरण उपोषण

Jul 01, 2026