संस्कृती लांडे

दुर्गम धानोरा बंजारातून ‘सैनिक’ स्वप्नांची भरारी, संस्कृती लांडेची देशपातळीवर दमदार कामगिरी

Sanskruti Lande: दुर्गम धानोरा बंजारा गावातून संस्कृती लांडे यांनी सैनिक शाळेच्या प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत ८९३ वी रँक मिळवली आहे. तिच्या यशामुळे समाज व कुटुंबाचा अभिमान उंचावला.

दुर्गम धानोरा बंजारातून ‘सैनिक’ स्वप्नांची भरारी, संस्कृती लांडेची देशपातळीवर दमदार कामगिरी

Sanskruti Lande

सेनगाव (Sanskruti Lande) : सेनगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या, अतिशय दुर्गम अशा धानोरा बंजारा गावातून एक प्रेरणादायी यशोगाथा समोर आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत येथील संस्कृती कैलासप्पा लांडे या विद्यार्थिनीने थेट देशपातळीवर आपला ठसा उमटवत ओडिशातील भुवनेश्वर येथील सैनिक शाळेच्या प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे.

शेतीवर उदरनिर्वाह करणारे व शिक्षणाची जिद्द मनाशी बाळगणारे कैलास आप्पा लांडे (Sanskruti Lande) यांनी आपल्या दोन्ही मुलींना मुलांप्रमाणेच शिक्षणाची समान संधी दिली. “परिस्थिती कशीही असली तरी मुलींनी शिकलेच पाहिजे,” हा निर्धार त्यांनी कायम ठेवला. याच जिद्दीच्या बळावर संस्कृतीने सैनिक शाळेच्या प्रवेश परीक्षेसाठी अभ्यास केला आणि तीनशे पैकी तब्बल २७६ गुण मिळवत देशात ८९३ वी रँक पटकावली.

संस्कृतीचे (Sanskruti Lande) प्राथमिक शिक्षण साखरा येथील कुमारेश्वर प्राथमिक विद्यालयात सुरू असून, ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामग्रीतून तिने गाठलेले हे यश विशेष ठरते. तिच्या या कामगिरीमुळे केवळ कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण धानोरा बंजारा, सेनगाव तालुका आणि जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे.

या (Sanskruti Lande) यशाबद्दल कुमारेश्वर प्राथमिक विद्यालयात संस्कृती व तिच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनीही आनंद व्यक्त करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. दुर्गम भागातील एका शेतकऱ्याच्या मुलीने देशपातळीवर झेप घेत सैनिक होण्याच्या स्वप्नाला गवसणी घातल्याने, “जिद्द असेल तर आकाशही मर्यादा नाही,” याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

संबंधित सामग्री

पावसाची उघडीप; शेतकरी चिंतेत

पावसाची उघडीप; शेतकरी चिंतेत

खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.

Jul 14, 2026
यशस्वी सापळा कारवाई : खिल्लारच्या तलाठ्याला 14 हजारांची लाच घेताना अटक

यशस्वी सापळा कारवाई : खिल्लारच्या तलाठ्याला 14 हजारांची लाच घेताना अटक

हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात गुरुवार, 5 जून 2026 रोजी ही सापळा कारवाई यशस्वी करण्यात आली. 

Jun 06, 2026