हिंगोली पोलिस भरती परीक्षा

हिंगोली जिल्हा चालक पोलिस शिपाई पदासाठी ५ एप्रिलला होणार लेखी परीक्षा

Hingoli Police Recruitment Exam: हिंगोली जिल्हात पोलिस चालक शिपाई पदाची लेखी परीक्षा ५ एप्रिलला होणार, ६२५ उमेदवार पात्र ठरले.

हिंगोली जिल्हा चालक पोलिस शिपाई पदासाठी ५ एप्रिलला होणार लेखी परीक्षा

Hingoli Police Recruitment Exam

लेखी परीक्षेसाठी 625 उमेदवार पात्र

हिंगोली (Hingoli Police Recruitment Exam) : जिल्हा पोलिस दलातील पोलिस चालक शिपाई पदाकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची ५ एप्रिलला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.  हिंगोली जिल्हा पोलिस दलातील रिक्त पोलिस शिपाई व चालक पदासाठी ११ फेबु्रवारी पासुन भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या टप्यात रामलिला मैदानावर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच शारिरीक चाचणी घेण्यात आली. या सोबतच चालक पदासाठी असलेल्या व पात्र ठरलेल्या उमेदवारांची वाहन चालविण्याचे कौशल्य चाचणी घेण्यात आली.

यामध्ये ६२५ उमेदवार पात्र ठरले आहेत. चालक पोलिस शिपाई - २०२४ - २५ दरम्यान वाहन चालविण्याची कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची (Hingoli Police Recruitment Exam) जिल्हा पोलिस दलाच्या संकेतस्थळावर यादी प्रसिध्द करण्यात आली. या निमित्त ५ एप्रिल रोजी हिंगोलीतील आदर्श महाविद्यालयावर सकाळी ११ वाजता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या करीता पात्र उमेदवारांनी सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी परीक्षा करीता येताना त्यांचे ऑनलाईन प्रवेश पत्र, मैदानी चाचणीच्या वेळी देण्यात आलेले ओळखपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.  निलाभ रोहण यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026