अनुराधा फार्मसी प्राध्यापक पीएच.डी.

अनुराधा फार्मसीच्या चार प्राध्यापकांना अमरावती विद्यापीठाची पीएच.डी. पदवी बहाल

Anuradha Pharmacy Professor PhD: डॉ. अमित सोनटक्के, डॉ. प्रियंका राठी, डॉ. स्वाती खेडेकर आणि डॉ. पूजा  गवंडर या चार प्राध्यापकांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती सर्वोच पीएच.डी. पदवी बहाल

अनुराधा फार्मसीच्या चार प्राध्यापकांना अमरावती विद्यापीठाची पीएच.डी. पदवी बहाल

Anuradha Pharmacy Professor PhD

 

संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात अनुराधा समूहाची उल्लेखनीय कामगिरी;
डॉ. अमित सोनटक्के, डॉ. प्रियंका राठी, डॉ. स्वाती खेडेकर व डॉ. पूजा गवंडर यांचे यश

चिखली (Anuradha Pharmacy Professor PhD) : अनुराधा ग्रुप ऑफ फार्मसी इन्स्टिट्यूट्स, चिखलीच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाविद्यालयाचे डॉ. अमित सोनटक्के, डॉ. प्रियंका राठी, डॉ. स्वाती खेडेकर आणि डॉ. पूजा  गवंडर   या चार प्राध्यापकांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्याकडून सर्वोच पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली आहे. कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. कैलाश आर. बियाणी यांच्या संशोधन मार्गदर्शन व पर्यवेक्षणाखाली, तसेच संस्थेच्या संशोधनपूरक वातावरणामुळे या प्राध्यापकांच्या शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीला महत्त्वपूर्ण बळ मिळाले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अनुराधा समूहातर्फे सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

फार्मसी शिक्षणासोबतच (Anuradha Pharmacy Professor PhD) उच्च दर्जाचे संशोधन, नवोपक्रम, ज्ञाननिर्मिती आणि प्राध्यापकांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याची परंपरा अनुराधा समूहाने सातत्याने जपली आहे. याच संशोधनाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीला चार प्राध्यापकांनी संपादन केलेल्या पीएच.डी. पदव्यांमुळे निश्चितच अधिक बळकटी मिळाली आहे.

डॉ. अमित सोनटक्के, डॉ. प्रियंका राठी, डॉ. स्वाती खेडेकर आणि डॉ. पूजा  गवंडर  यांनी अध्यापनाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना संशोधन क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान दिले. पीएच.डी. संशोधनाच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी संशोधनातील सातत्य, शिस्त, चिकाटी, मेहनत आणि शैक्षणिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या यशामुळे संस्थेतील विद्यार्थी तसेच युवा प्राध्यापकांना उच्च शिक्षण व संशोधनासाठी निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.

अनुराधा समूहाचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण देण्यासोबतच संशोधनाची संस्कृती रुजविणे, प्राध्यापकांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि फार्मसी क्षेत्रातील नवनवीन संशोधनाला चालना देणे यावर विशेष भर दिला जात आहे. कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. कैलाश आर. बियाणी यांच्या शैक्षणिक नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या संशोधन व उच्च शिक्षणाच्या वाटचालीस सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. याच प्रयत्नांचे फलित म्हणून चार प्राध्यापकांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्याने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

या यशाबद्दल अनुराधा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, सचिव अॅड. वृषालीताई बोंद्रे, कोषाध्यक्ष सिद्धेश्वरजी वानेरे, कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. कैलाश आर. बियाणी, प्राचार्य डॉ.रवींद्र काळे, प्राचार्य डॉ.रमेश पागोरे, प्राचार्य डॉ.गोपाल बिहानी तसेच समूहातील सर्व  प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी चारही प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “प्राध्यापकांचे उच्च शिक्षण आणि संशोधनातील प्रगती ही केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाकडे पाहण्याची नवी दृष्टी व प्रेरणा मिळेल आणि अनुराधा समूहाची संशोधन क्षेत्रातील वाटचाल आणखी वेगाने पुढे जाईल.”

चारही प्राध्यापकांच्या या (Anuradha Pharmacy Professor PhD) उल्लेखनीय यशामुळे अनुराधा फार्मसीची ‘शिक्षणासोबत संशोधन आणि संशोधनासोबत उत्कृष्टता’ ही ओळख अधिक दृढ झाली आहे. उच्च शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने संस्थेच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना या यशामुळे निश्चितच नवी ऊर्जा मिळाली आहे.

डॉ. अमित सोनटक्के, डॉ. प्रियंका राठी, डॉ. स्वाती खेडेकर आणि डॉ. पूजा  गवंडर  यांच्या या अभिमानास्पद शैक्षणिक यशाबद्दल अनुराधा समूहातील सर्व घटकांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी संशोधन कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.