युवक आत्महत्या

नौकरीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

Youth suicide: युवकने नैराश्यामुळे भोवतीच्या छतावरून आत्महत्या करून मृत्यू होण्याची घटना झाली. अपेक्षित यश मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल

नौकरीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या

Youth suicide


औंढा नागनाथ तालुक्यातील रूपूर येथील दुर्दैवी घटना

औंढा नागनाथ (Youth suicide) : तालुक्यातील रुपूर येथील अर्जुन शिवाजी गीते (२४) या नोकरी भरतीची तयारी करणार्‍या युवकाने नैराश्यातून घरातील छताच्या हुकाला सुताच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ५ जुलै रविवार रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची माहिती ग्रामस्थांनी औंढा नागनाथ पोलिसांना कळविली.यानंतर पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, जमादार रविकांत हरकळ तसेच पोलीस कर्मचारी किशोर पारिसकर आणि अभिजीत कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला आणि उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह (Youth suicide) अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अर्जुन गीते यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मागील काही महिन्यांपासून ते विविध नोकरी भरती परीक्षांची तयारी करत होते. मात्र, अपेक्षित यश मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे रुपूर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संबंधित सामग्री

घोषणांचा गजर, जेन झी मात्र बेकार!

घोषणांचा गजर, जेन झी मात्र बेकार!

नीतिगुरुंच्या २ कटी रोजगाराची आश्वासने असताना ११ वर्षांत दिसून आलेल्या मागणीमध्ये दिसून येत आहे, तथापि युवक-युवा महिलांना कौशल्याशिवाय रोजगार मिळण्याची अवस्था वाढत आहे. शिक्षणाची अपेक्षा आणि कौशल्याच्या अभावामुळे रोजगारावर अडथळे पडले आहेत.

Sep 02, 2026
परभणीत मराठा आरक्षणाच्या विवंचनेत देवगाव फाटा येथील तरूणाची आत्महत्या

परभणीत मराठा आरक्षणाच्या विवंचनेत देवगाव फाटा येथील तरूणाची आत्महत्या

Parbhani Youth Suicide: मराठा आरक्षण कधी मिळणार या विवंचनेत ३४ वर्षीय तरूणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी देवगाव फाटा शिवारात उघडकीस आली.

Aug 30, 2026
जिवती येथिल २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जिवती येथिल २३ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Jivati Farmer Suicide: २३ वर्षीय तरुण शेतकरी पवन दत्ता राठोडने कर्जाच्या परतफेडातील अडचण आणि शेतकरी कष्टांमुळे आत्महत्या केली. त्याच्या वडिलांचे मृत्यू आणि कुटुंबाचे बोझ पालनपोषणाची जबाबदारी

Jul 16, 2026
इल्लूर येथे खड्यात बुडून सहा वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

इल्लूर येथे खड्यात बुडून सहा वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ilur little Girl Death: इल्लूर गावात सहा वर्षीय चिमुरडीचा पाण्याने भरलेल्या खड्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना, संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली..

Jul 06, 2026
मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

Palam youth suicide: सायंकाळी अंजनवाडी-शेखराजूर फाट्यावरील गावाकडे जाण्याच्या रस्त्यावर धाब्यात मराठी मारण्याचा अपमान झाल्यानंतर एक युवकाने आत्महत्या केली.

Jun 23, 2026