आमदार श्वेता महाले पाटील

धाड परिसरातील यशवंत युवकांचा आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते गौरव

MLA Shweta Mahale Patil: धाड परिसरातील युवक-युवतींचा व त्यांच्या पालकांचा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते सत्कार...

धाड परिसरातील यशवंत युवकांचा आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते गौरव

MLA Shweta Mahale Patil

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : देशसेवेचा अभिमान आणि कर्तृत्वाचा गौरव करणारा प्रेरणादायी सोहळा धाड येथे उत्साहात पार पडला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भारतीय सैन्य दल, पोलीस तसेच विविध शासकीय सेवांमध्ये नव्याने निवड झालेल्या धाड परिसरातील युवक-युवतींचा व त्यांच्या पालकांचा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी सांगितले की, देशसेवेची भावना, कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने शासकीय सेवेत यश संपादन करत आहेत. या यशामागे राज्यातील पारदर्शक भरती प्रक्रिया आणि गुणवत्तेला दिलेले प्राधान्य हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध विभागांमधील भरती प्रक्रियांना गती देण्यात आली असून, गुणवत्तेच्या आधारे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने उमेदवारांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील होतकरू युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव तथा चिखली विधानसभा मतदारसंघाशी जिव्हाळ्याचे नाते असलेले श्री. विद्याधर महाले यांनी मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणीची संकल्पना मांडली. त्यानुसार विविध ठिकाणी अभ्यासिकांची उभारणी व शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून अनेक युवकांना शासकीय सेवेत यश मिळविण्यास त्याचा लाभ होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने युवकांना रोजगार, कौशल्य विकास, पारदर्शक प्रशासन आणि डिजिटल प्रणालीद्वारे संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. गुणवत्तेच्या आधारे संधी मिळण्याचा विश्वास वाढल्याने देशसेवेची प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने सैन्य, पोलीस आणि विविध शासकीय सेवांमध्ये प्रवेश करत आहेत.

या प्रेरणादायी सोहळ्यात यशस्वी युवकांचा गौरव करताना समाजासमोर एक सकारात्मक आदर्श उभा राहिला. राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या या युवकांच्या यशात त्यांच्या पालकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत आमदार श्वेता महाले पाटील यांनी व्यक्त केले.

या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा यांचे आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी भाजप जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील जाधव, डॉ. तेजराव नरवाडे, भाजप नेते सुनील देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे, सरपंच सावित्रीबाई बोर्डे, विष्णू वाघ, प्रवीण वाघ, विष्णू उगले, संदीप उगले, शहराध्यक्ष अनिल कुटे, सरपंच अनिल फेपाळे, दिगंबर जाधव, गणेश साखरे, प्रकाश राऊत तसेच आयोजक किरण सरोदे, योगेश राजपूत, विशाल विसपुते, गणेश बाजी आणि युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रदीप टाकसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केला.

Oct 02, 2026