आजेगाव पिकअप अपघात

आजे़गाव येथील तरुणाचा पिकअप अपघातात जागीच मृत्यू

Ajegaon pickup accident: आजेगाव, सेनगाव तालुक्यातील एक जवान, कृष्णा गजानन हलगे (३०), मोटर सायकलवरून पिकअप वाहनापासून झालेल्या अपघातात जागीच मृत झाला.

आजे़गाव येथील तरुणाचा पिकअप अपघातात जागीच मृत्यू

Ajegaon pickup accident

आजेगाव (Ajegaon pickup accident) : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवासी कृष्णा गजानन हलगे (३०) याचा शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. कृष्णा सेनगाव येथे दुकानाचे कामकाज आटोपून रात्री आठच्या सुमारास मोटर सायकलवरून आजेगावकडे परत येत होता. साखरखंड गाव ओलांडल्यानंतर उतारावर समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची व त्याच्या मोटर सायकलची जोरदार धडक झाली. या अपघातात कृष्णा हलगे जागीच ठार झाला.

घटनेची माहिती गावात कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कृष्णा स्वभावाने अतिशय मनमिळावू आणि सर्वांशी प्रेमाने वागणारा होता. त्याच्या अकाली निधनाने आजेगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कृष्णाचे वडील गजानन हलगे यांचेही गेल्या वर्षीच अचानक निधन झाले होते. आई-वडिलांचा तो लाडका आणि घरात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, पाच बहिणी, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

अपघातानंतर (Ajegaon pickup accident) पोलिसांनी पिकअप वाहन ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला होता. रविवारी आजेगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील एकुलता एक आधार हरपल्याने हलगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

छतावर वडील, जिन्यावर आई-मुलगी, पलंगाखाली मुलाचा मृतदेह!

छतावर वडील, जिन्यावर आई-मुलगी, पलंगाखाली मुलाचा मृतदेह!

Bangladesh Hindu Family Death: बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये निवृत्त शाळा शिक्षक

Aug 24, 2026
शहीद हरिदास कापसेंच्या स्मृती जपणार; शेलसूरमध्ये स्मारक उभारणार: आ. श्वेता महाले पाटील

शहीद हरिदास कापसेंच्या स्मृती जपणार; शेलसूरमध्ये स्मारक उभारणार: आ. श्वेता महाले पाटील

Martyr Haridas Kapse: भारतमातेच्या सेवेसाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान स्व. हरिदास कापसे यांच्या अस्थिकलश शोकसभेस चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील..

Aug 13, 2026
परभणीत उंदराचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

परभणीत उंदराचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

Gangakhed Youth Death: गंगाखेड येथे उंदीर मारायचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. ही (Gangakhed Youth Death) घटना सोमवार सकाळी घडली.

Aug 10, 2026
रोवणीचे काम आटोपून तलावात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा  बुडून मृत्यू

रोवणीचे काम आटोपून तलावात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा  बुडून मृत्यू

Khedegaon Youth Death: धानोरी येथील पंकज दिलीप वाटगुरे (वय अंदाजे २५ वर्ष )या युवकाचा गावाशेजारील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

Aug 02, 2026
परभणीत अति दारू सेवनामुळे ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू

परभणीत अति दारू सेवनामुळे ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू

Alcohol Consumption Death: अति दारू सेवन केल्यामुळे ५४ वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार २४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता गंगाखेड शहरातील एमआयडीसी परिसरात उघडकीस

Jul 25, 2026