परभणी हत्या प्रकरण

परभणीत चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला संपवले.....!

Parbhani murder case: परभणी तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे एका शेत आखाड्यावर स्त्रीने पत्नीला जबरजस्तीने मारून ठार मारा. घटना झाल्यानंतर पत्नीच्या चरित्रावर संदेह करून त्याला गंभीर जखमी

परभणीत चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला संपवले.....!

Parbhani murder case

 

परभणी तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे शेत आखाड्यावरील घटना

परभणी (Parbhani murder case) : चारित्र्यावर संशय घेत काठीने जबर मारहाण करत पतीने पत्नीला संपविले. ही घटना गुरुवार ११ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास परभणी तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे एका शेत आखाड्यावर उघडकीस आली. पत्नीचा खून केल्या प्रकरणी पती विरोधात परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजश्री कैलास कुलकर्णी वय ३५ वर्ष, असे मयत महिलेचे नाव आहे. सदर प्रकरणात मयताचा भाऊ अर्जून देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांना ब्राम्हणगाव येथील संतोष तुरे यांचा फोन आला. त्यांनी फिर्यादीला तुमची बहिण राजश्री हिला जबर मारहाण झाली असून ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. त्यांनतर फिर्यादी व त्यांचा आतेभाऊ ब्राम्हणगाव येथील शेत आखाड्यावर गेले.

या ठिकाणी राजश्री जखमी अवस्थेत दिसली. तिला उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात नेले असता या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. कैलास कुलकर्णी याने पत्नी राजश्री हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला काठीने डोक्यात, नाकावर, पोटावर गंभीर दुखापत करुन ठार मारले. या (Parbhani murder case) प्रकरणी परभणीच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण राजेंद्र शिरतोडे, पोनि. सुरेश थोरात, पोलीस पाटील विकास सोनवणे यांनी भेट देवून पाहणी केली.

संबंधित सामग्री

परभणीत पत्नीने कट रचून केला पतीचा खून; पत्नीसह साथीदारांवर गुन्हा...!

परभणीत पत्नीने कट रचून केला पतीचा खून; पत्नीसह साथीदारांवर गुन्हा...!

Parbhani Khandoba Corner Murder: परभणीत रविवारी मध्यरात्री, एका ३० वर्षीय पतीचा (फेरोज खान) पत्नी जिनत खानने धारदार शस्त्राने वार करून खून केला. चारित्र्याच्या संशयावरून सुरू असलेल्या वादातून हा खून

Jun 01, 2026