घनकचरा विलगीकरण केंद्र आग

आगीत घनकचरा विलगीकरण केंद्रातील कचरा जळून खाक

Waste Segregation Center Fire: वाशिम शहरातील घनकचरा विलगीकरण केंद्रात आग लागून सुमारे ३६ लाख रुपयांचा नुकसान झाला. काही व्यक्तींवर जाणूनबुजून आग लावण्याचा आरोप आहे.

आगीत घनकचरा विलगीकरण केंद्रातील कचरा जळून खाक

Waste Segregation Center Fire

 

३६ लाखांचे नुकसान; मुद्दाम आग लावल्याची शहर पोलिसांत तक्रार

वाशिम (Waste Segregation Center Fire) : शहरातील डंम्पिंग ग्राऊंड स्थित घनकचरा विलगीकरण व प्रक्रिया केंद्र परिसरात 7 मे रोजी आग लागली होती. या आगीत वर्गीकृत सुका कचरा जळून खाक झाला. या आगीत अंदाजे ३६ लाख रुपयांचे नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला. तर काही व्यक्तींनी जाणूनबुजून आग लावल्याची तक्रार 8 मे रोजी वाशिम शहर पोलिस ठाण्यात घनकचरा विलगीकरण व प्रक्रिया केंद्राकडून करण्यात आली आहे.

शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, (Waste Segregation Center Fire) घनकचरा प्रकल्पात शहरातील कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून प्रक्रिया केली जाते. मागील सहा महिन्यांपासून दररोज सुमारे दोन टन प्रमाणे वर्गीकृत सुका कचरा गोडाऊनबाहेरील सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्यात आला होता. त्याचे एकूण प्रमाण सुमारे ३६० टन इतके होते. ७ मे रोजी डम्पिंग ग्राउंड परिसरातील मिश्रित कचऱ्याला आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. त्यानंतर काही व्यक्तींनी चिथावणी देत वर्गीकृत सुक्या कचऱ्यालाही आग लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या (Waste Segregation Center Fire) घटनेमुळे पर्यावरण प्रदूषण, आरोग्याचा धोका आणि घनकचरा व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली. 

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026