अकोला येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक
दुष्काळ, पीकविमा व कर्जमाफीसाठी आक्रमक आंदोलनाचा निर्धार
चिखली (Vidarbha Farmers Andolan) : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर आगामी काळात करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या नियोजनासाठी अकोला येथे 11 सप्टेंबर 2024 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम विदर्भात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पीकविमा नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, तसेच पशुधनासाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.पश्चिम विदर्भात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.
अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून शेतकऱ्यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शासनाने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई तातडीने मिळावी, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळावा, आगामी रब्बी हंगामासाठी आवश्यक बियाणे व खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत, तसेच पावसाअभावी निर्माण होणाऱ्या चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करावी, या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.
या (Vidarbha Farmers Andolan) बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आमदार नितीनभाऊ देशमुख, उपनेते सुधीरजी सूर्यवंशी, प्रवक्ता जयश्रीताई शेळके, बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्रजी खेडेकर, बुलढाणा जिल्हाप्रमुख जालिंधरभाऊ बुधवत, अकोला लोकसभा संपर्कप्रमुख निलेशभाऊ धुमाळ, ज्येष्ठ नेते सेवकरामजी ताथोड, सहसंपर्कप्रमुख वसंतरावभाऊ भोजने, अमरावती जिल्हाप्रमुख मनोजभाऊ कडू, परागभाऊ गुडदे, प्रफुल्लभाऊ भोजने, अकोला जिल्हाप्रमुख गोपालभाऊ दातकर, मुकेशभाऊ मुरूमकार, बुलढाणा जिल्हा समन्वयक गजाननभाऊ धांडे, वाशिम जिल्हाप्रमुख बालाजीभाऊ वानखेडे, यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रवीणभाऊ शिंदे, महिला आघाडी संपर्क संघटिका सागरताई पुरी, अकोला महिला आघाडी संघटिका सागरताई वाकोडे, बुलढाणा महिला आघाडी संघटिका विजयाताई खडसन, वाशिम जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, युवासेना वाशिम जिल्हाप्रमुख रामहरी सावके यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा निर्धार या बैठकीत व्य व्यक्त करण्यात आला.