चामोर्शी तहसील

एसटी बस थांबा नसल्याने वयोवृद्धांची पायपीट

ST Bus Stop: चामोर्शी तहसील कार्यालयाजवळ एसटी बस थांबा नसल्यामुळे वयोवृद्ध आणि निराधार नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांनी

एसटी बस थांबा नसल्याने वयोवृद्धांची पायपीट

ST Bus Stop

चामोर्शी तहसील कार्यालयाजवळ थांबा सुरू करण्याची मागणी

घोट (ST Bus Stop) : संपूर्ण महाराष्ट्रातसह विदर्भात  उन्हाळ्याच्या दाहकतेने  सर्वसामान्याची लाई लाई होत असतांनाच  चामोर्शी–गडचिरोली मार्गावरील चामोर्शी तहसील कार्यालयाजवळ एसटी बस थांबा नसल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयात विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी येथे अधिकृत बस थांबा सुरू करण्याची मागणी केली आहे.तहसील कार्यालय ते (ST Bus Stop) बस स्थानक यांदरम्यान सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतर आहे. सध्या एसटी बसेस फक्त बसस्थानकावरच प्रवाशांना उतरवत असल्याने नागरिकांना तहसील कार्यालयापर्यंत पायी जावे लागते. विशेषतः उन्हाळ्यात ही पायपीट अधिकच त्रासदायक ठरत असून वयोवृद्ध, महिला व आजारी व्यक्तींना याचा मोठा फटका बसत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, पूर्वी तहसील कार्यालयाजवळ बस थांबा (ST Bus Stop) होता. मात्र या ठिकाणी काही अपघातांच्या घटनां घडल्यामुळे चालकांकडून या ठिकाणी थांबण्यास टाळाटाळ केली जात आहे.परिणामी ज्येष्ठ नागरिक,विधवा महिला तसेच निराधार व्यक्तींना मोठ्या कसरतीने तहसील कार्यालय गाठावे लागते. अनेक नागरिकांकडे स्वतःचे वाहन नसल्याने ते पूर्णपणे एसटी सेवांवर अवलंबून आहेत.परंतु बस थेट तहसील कार्यालयाजवळ मार्गावर थांबत नसल्यामुळे त्यांना पायी चालत जावे लागते किंवा इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते.

याशिवाय, खाजगी वाहनेही या (ST Bus Stop) मार्गावर थांबण्यास नकार देत असल्याने समस्या अधिकच गंभीर झाली आहे. तहसील कार्यालयासमोर अधिकृत एसटी बस थांबा सुरू करून तात्काळ ज्येष्ठ नागरिक,महिला व सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी तालुक्यातील सर्वस्तरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

ST प्रवाशांसाठी मोठी अपडेट! महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

१ ऑक्टोबरपासून ST सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य होणार. महिला व ज्येष्ठ नागरिकांना QR पावती, BHIM App आणि OTPची सुविधाही मिळणार.

Sep 29, 2026
तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

तहसील कार्यालयासह सरकारी कचेऱ्या झाल्या भटक्या कुत्र्यांचे विश्रांती गृह!

Manora Tehsil Office: मानोरा शहरातील गजबजलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांपेक्षा भटक्या श्वानांचा मुक्त वावर वाढला असून, कामकाजाच्या वेळेतच या कुत्र्यांनी सरकारी कार्यालयात..

Sep 27, 2026
दुष्काळ जाहीर करण्याची माकपा व किसान सभेची मागणी

दुष्काळ जाहीर करण्याची माकपा व किसान सभेची मागणी

Renapur Drought Demand: दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा

Sep 23, 2026
एसटी आरक्षणाच्या मागणीच्या उपोषणाची तूर्तास सांगता; न्या. टहलियानी अभ्यास समितीला मुदतवाढ!

एसटी आरक्षणाच्या मागणीच्या उपोषणाची तूर्तास सांगता; न्या. टहलियानी अभ्यास समितीला मुदतवाढ!

पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण तूर्तास स्थगित; न्या. टहलियानी अभ्यास समितीला अहवालासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ.

Sep 21, 2026
दुधातील भेसळ रोखली, पण दर वाढले; पुण्यात प्रतिलिटर १० रुपयांची वाढ

दुधातील भेसळ रोखली, पण दर वाढले; पुण्यात प्रतिलिटर १० रुपयांची वाढ

FDAच्या भेसळविरोधी कारवाईनंतर दुधाचा पुरवठा घटल्याने पुणे जिल्ह्यात दर वाढले आहेत. ३५ रुपयांवरून दूध सुमारे ४५ रुपये लिटर झाले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Sep 19, 2026