Vasmat Municipal Council

वसमत न.प. उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला; मात्र संधी कोणाला, यावर अद्याप निर्णय नाही

वसमत नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी मुहूर्त निश्चित झाला असून, २७ ऑगस्ट रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

वसमत न.प. उपाध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला; मात्र संधी कोणाला, यावर अद्याप निर्णय नाही

Vasmat Municipal Council

२७ ऑगस्ट रोजी विशेष सभा; अनेक नगरसेवक इच्छुक, अंतिम निर्णयाकडे लक्ष

वसमत : वसमत नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी मुहूर्त निश्चित झाला असून, २७ ऑगस्ट रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, रिक्त उपाध्यक्षपदाची संधी नेमकी कोणाला मिळणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे ‘मुहूर्त ठरला, पण उमेदवार ठरला नाही’, अशी परिस्थिती वसमतच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वसमत नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी नगरपरिषद सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. ही सभा २७ ऑगस्ट रोजी वसमत नगरपालिका सभागृहात होणार असून, उपविभागीय अधिकारी विकास माने हे पिठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नगर परिषदेचे उपाध्यक्ष सय्यद इमरान अली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपाध्यक्षपद रिक्त झाले आहे. या रिक्त पदावर नवीन उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी या पदासाठी कोणाची निवड होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नगरपालिकेतील अनेक नगरसेवक या पदासाठी इच्छुक असून, प्रत्येक इच्छुक सदस्य आपली मागणी रेटण्यासाठी शिष्टमंडळ पाठवत असल्याचे दिसून येत आहे.

संधी कोणाला मिळणार?

वसमत नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदावर वर्णी लागावी, यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अखेर या पदाची संधी कोणाला मिळते, हे २७ ऑगस्ट रोजी आणि त्यावेळी स्पष्ट होणार आहे.

मात्र, इच्छुक अनेक असले तरी आमदार राजू पाटील नवघरे ठरवतील त्या सदस्यास उपाध्यक्षपदाची संधी मिळेल, यात शंका नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026