Vasant More

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान वसंत मोरे ताब्यात; विरोध प्रदर्शनावेळी पोलिसांची कारवाई

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले.

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यादरम्यान वसंत मोरे ताब्यात; विरोध प्रदर्शनावेळी पोलिसांची कारवाई

Vasant More

अमित शाहांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी आलेल्या ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांवर कारवाई; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाने विविध ठिकाणी निषेध आंदोलन करत शाह यांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या दौऱ्याला विरोध नोंदवण्यासाठी वसंत मोरे आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कारवाई केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये काही पोलीस वसंत मोरे यांना पोलिसांच्या वाहनात बसवताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये वसंत मोरे हे पोलिसांच्या गाडीत बसण्यास तयार नसल्याचे दिसून येते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवल्याचे दृश्य समोर आले आहे. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी केल्याचेही पाहायला मिळते.

दरम्यान, ताब्यात घेत असताना पोलिसांनी आपला मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. तसेच काही पोलिसांनी आपला गळा दाबल्याचाही आरोप त्यांनी केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अमित शाह हे काल पुण्यात दाखल झाले असून ते शहरातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी त्यांनी उपस्थिती लावली. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला असून अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित मारहाणीचा मुद्दा तसेच अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या प्रकरणावरून काँग्रेससह विविध संघटनांनी शाह यांच्या पुणे दौऱ्याला विरोध केला. या आंदोलनात सहभागी झालेल्या वसंत मोरे यांच्यावर पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली.

संबंधित सामग्री

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026