वानर अपघाती मृत्यू

हिंगोली-नांदेड महामार्गावर वानराचा अपघाती मृत्यू; फलक न लावल्याने प्राणी मित्र आक्रमक

Monkey Accidental Death: हिंगोली नांदेड महामार्गावर एका प्राणी मित्रांनी वनराचा अपघात दाखवून सांगितला, ज्या वाहनाच्या धडक्यात मृत झाले. फळक न लावल्यामुळे वन्यजीवांचा सुरक्षित गती कमी

हिंगोली-नांदेड महामार्गावर वानराचा अपघाती मृत्यू; फलक न लावल्याने प्राणी मित्र आक्रमक

Monkey Accidental Death

हिंगोली (Monkey Accidental Death) : हिंगोली ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सावरखेडा पुलाजवळ शनिवारी एका वानराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडताना हा अपघात घडला. ही दुर्दैवी घटना प्राणी मित्र हरिभाऊ हरण, गजानन हरण, श्याम हरण, आदिनाथ हरण, दीपक कर्डीले आणि रामप्रसाद जाधव खानापूरकर यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या (Monkey Accidental Death) सर्व प्राणी मित्रांनी मृत वानरावर विधिवत अंतिम संस्कार केले.

या महामार्गावर वन्यजीवांचे अपघात वारंवार घडत असून आतापर्यंत हजारो मुक्या प्राण्यांचा बळी गेला आहे. येथे वन्यजीवांचा वावर असल्याचे दर्शवणारे सूचना फलक लावावेत अशी मागणी वनविभागाकडे अनेकदा करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे, अशी खंत प्राणी मित्रांनी व्यक्त केली. (Monkey Accidental Death) वनविभागाच्या या दुर्लक्षामुळे प्राणी मित्रांमध्ये तीव्र नाराजी आहे. जर येत्या काही दिवसांत या अपघातप्रवण क्षेत्रात 'वन्यजीव कॉरिडॉर'चे फलक आणि वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत, तर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्राणी मित्र संघटनेने दिला आहे.