चिखली (Shelgaon Jahangir Case) : चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली. संबंधित प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. घटनेनंतर दलित पँथरचे नेते दीपक केदार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली. त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत प्रशासनाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली.
त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष सागर पुरोहित, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेत्या ॲड. शर्वरी तुपकर, विनायक सरनाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव यांच्यासह विविध पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनीही रुग्णालयात भेट देत जखमी महिलेची विचारपूस केली आणि कुटुंबाला धीर दिला. व आरोपीना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, जखमी महिलेची मुलगी प्रतीक्षा साळवे हिने एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध करून आमदार श्वेता महाले पाटील यांच्यासह मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच या (Shelgaon Jahangir Case) प्रकरणात आपली भूमिका मांडत संबंधित व आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी चार जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रदीप मुरलीधर पाटील करीत आहेत. प्रकरणाचा तपास सुरू असून, वस्तुस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
शेलगाव जहांगीर प्रकरणानंतर विविध पक्षांच्या प्रतिनिधींकडून जखमी महिलेची भेट
Shelgaon Jahangir Case: चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर येथे शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट
Shelgaon Jahangir Case
संबंधित सामग्री
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी
नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू
ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम
आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज
मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर
लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा