स्वाधार योजना

स्वाधार ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी  मंगळवारपर्यंत मुदत

Swadhar Yojana: हिंगोलीतील स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी रविवार, 5 मे 2026 ही अंतिम मुदत जाहीर केली गेली आहे. विद्यार्थ्यांनी मुदतीत त्रुटी दूर करून अर्ज पूर्ण करावे.

स्वाधार ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी  मंगळवारपर्यंत मुदत

Swadhar Yojana

हिंगोली (Swadhar Yojana) : शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org/⁠ या संकेतस्थळावर केलेल्या ऑनलाईन अर्जांची नुकतीच तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी 147 अर्ज विद्यार्थी लॉगिनवर त्रुटी पूर्ततेसाठी प्रलंबित आहेत. अर्जांची ऑनलाईन त्रुटी पूर्तता करण्यासाठी रविवार, दि.5 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असल्याचे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र ठरूनही प्रवेश न मिळालेल्या तसेच निवास, भोजन व इतर सुविधा अभावी पुढील शिक्षण घेण्यास अडचणी येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या (Swadhar Yojana) योजनेअंतर्गत इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते. निर्धारित मुदतीत विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता न केल्यास त्यांना पुढील शैक्षणिक सत्रात अर्ज करता येणार नाही तसेच योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.

संबंधित विद्यार्थ्यांनी 05 मे 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्जातील त्रुटी पूर्तता करून अर्ज सादर करावा. तसेच (Swadhar Yojana) ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाजकल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026