स्वाधार शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटीची पूर्तता करा - सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांचे आवाहन

ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत आहेत अशा विद्यार्थ्यांनी येत्या 5 मे पर्यंत त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

स्वाधार शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटीची पूर्तता करा - सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांचे आवाहन

Swadhar Scholarship

अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी मंगळवार 5 मे 2026 पर्यंत मुदतवाढ

नांदेड (Swadhar Scholarship) : अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जात आहे. सन 2025-26 मधील अर्जातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी मंगळवार 5 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत आहेत अशा विद्यार्थ्यांनी येत्या 5 मे पर्यंत त्रुटीची पूर्तता करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

ही योजना जिल्हा तसेच तालुकास्तरावर राबविण्यात येत असून, जे महाविद्यालय महानगरपालिकेपासून पाच किलोमीटरच्या आतमध्ये व नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत तसेच तालुक्याच्या हद्दीत असलेले महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अर्ज केलेल्या असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन आपला यूजर आयडी व पासवर्ड टाकून अर्जाची सद्यस्थिती पहावी.

जर अर्ज Send Back मध्ये असेल तर विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या त्रुटीची पूर्तता व्यवस्थितरित्या परिपूर्ण कागदपत्रासह येत्या 5 मे पर्यंत पूर्ण करायची आहे. मुदतवाढ ही शेवटची असेल याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. सदरील अपलोड केलेले कागदपत्र प्रत्यक्ष कार्यालयात आणून देण्याची आवश्यकता नाही. आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर सदरील मॅसेज आल्यानंतर तत्काळ स्वाधारला अर्ज करायचा आहे. जर आपला अर्ज Approved असेल तर आपल्या बँक खात्याची माहिती त्या ठिकाणी योग्यरीत्या भरायचे आहे. आपले बँक खाते क्रमांक हे आधार संलग्न असणे आवश्यक आहे.

जर आपला अर्ज Under Scrutiny मध्ये असेल तर त्या अर्जाची तपासणी प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तुत कार्यालयाअंतर्गत समाज कल्याण कार्यालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज इंस्टाग्राम व फेसबुक पेज “samajkalyannanded” याला फॉलो करून आपल्या येणाऱ्या अडचणीबाबत वेळोवेळी देण्यात आलेली माहिती पाहून शंकेचे निरसन करावे.

बाहेर इतर कुठल्याही अनाधिकृत ग्रुप किंवा व्यक्तीशी संपर्क न साधता थेट प्रस्तुत कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांना येऊन आपल्या समस्याबद्दल विचारणा करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले आहे.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026