“अब्बू, मला घरी घेऊन जा”; मुलीच्या शेवटच्या फोननंतर काही तासांत मृत्यू

अमरावती येथील सौदागरपुरा परिसरातील १९ वर्षीय फाजीला जबील मोहम्मद जुबेर हिच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे.

“अब्बू, मला घरी घेऊन जा”; मुलीच्या शेवटच्या फोननंतर काही तासांत मृत्यू

Suspicious Death Case

अमरावती (Suspicious Death Case) : अमरावती येथील सौदागरपुरा परिसरातील १९ वर्षीय फाजीला जबील मोहम्मद जुबेर हिच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. विवाहानंतर फाजीला ही नागपूर येथील गोरियानगर, मोमीनपुरा परिसरात सासरी राहत होती. मात्र सासरच्या मंडळींकडून सतत त्रास दिला जात असल्याची माहिती तिने वारंवार आपल्या वडील आणि भावाला फोनवरून दिली होती.

१५ मे रोजी “अब्बू, मला लवकर अमरावतीला घेऊन जा,” असा फाजीला हिचा शेवटचा फोन माहेरच्या कुटुंबीयांना आला होता. मात्र त्यानंतर काही वेळातच फाजीला हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सासरच्या मंडळींकडून देण्यात आली.

मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच आई-वडील नागपूरला पोहोचले. त्यावेळी फाजीला हिचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत होता. तसेच तत्काळ दफनविधी करण्याची घाई सासरच्या मंडळींकडून करण्यात येत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, मृतदेह अमरावती येथे आणल्यानंतर आंघोळ घालताना फाजीला हिच्या गळ्यावर व्रण दिसून आल्याने संशय अधिक बळावला. यानंतर शेकडो नातेवाईकांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली.

यानंतर १७ मे रोजी नायब तहसीलदार टीना चव्हाण आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कब्र उकरून फाजीला हिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. या प्राथमिक अहवालात गळा आवळणे किंवा श्वसनक्रिया बंद पडल्याने मृत्यू झाल्याचा उल्लेख करण्यात आल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

कुटुंबातील व्यक्तींवर संशय

फाजीला हिच्या दिराची पत्नी गर्भवती असल्याने ती माहेरी गेली होती. त्यानंतर दीर फाजीला हिच्यावर वाईट नजर ठेवत असल्याची माहिती तिने आपल्या भावाला फोनवरून दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पती मोहम्मद जुबेर, दीर मोहम्मद इरफान मोहम्मद जलील आणि सासरे मोहम्मद जलील उर्फ संजू पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या; एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू

ठाण्यात शिवसेना (UBT) नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या. एकाला अटक, दुसऱ्याची चौकशी सुरू; हत्येमागील कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sep 30, 2026
आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या शोधासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; चान्नी ठाण्यात ठिय्या, ७२ तासांचा अल्टिमेटम

आलेगाव येथील १३ वर्षीय आदिवासी मुलगी बेपत्ता असून, शोधासाठी वंचित बहुजन आघाडीने चान्नी ठाण्यात ठिय्या देत ७२ तासांचा अल्टिमेटम दिला.

Sep 29, 2026

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून सीए तणावात; आत्महत्येपूर्वी WhatsApp मेसेज

मुंबईत ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वीच्या WhatsApp मेसेजच्या आधारे पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल.

Sep 24, 2026
केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

केतन अग्रवाल प्रकरण: सियाने ChatGPT वर काय शोधलं? दोषारोपपत्रातून माहिती समोर

लोहगडच्या दरीत नेऊन केतनचा मृत्यू; आरोपींनी घटनास्थळासह लोणावळ्यातील दरीतील मृत्यूंची माहिती शोधल्याचा पोलिसांचा दावा

Sep 23, 2026