सिरसम विद्यार्थिंनी आंदोलन

सिरसम बु. परिसरात बसची संख्या वाढविण्यासाठी विद्यार्थिंनीचा ठिय्या

Sirsam Sudents Protest: संतप्त विद्यार्थिनींनी ठिय्या मांडून चांगली बस पाठविण्याची आणि बसची संख्या वाढविण्याची मागणी केली.

सिरसम बु. परिसरात बसची संख्या वाढविण्यासाठी विद्यार्थिंनीचा ठिय्या

Sirsam Sudents Protest

 

सिरसम बु . परिसरात खराब बसने विद्यार्थिनी त्रस्त

खेर्डा (Sirsam Sudents Protest) : हिंगोली तालुक्यातील सिरसम बु. परिसरातून शाळेत ये-जा करणार्‍या विद्यार्थिनींना मानव विकास महामंडळाच्या खराब बसचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे १८ जुलै शनिवार रोजी संतप्त विद्यार्थिनींनी ठिय्या मांडून चांगली बस पाठविण्याची आणि बसची संख्या वाढविण्याची मागणी केली.  गेल्या अनेक दिवसांपासून सिरसम बु. ते हिंगोली मार्गावर धावणारी मानव विकासची बस वारंवार बंद पडत आहे. बसच्या सीट तुटलेल्या आहेत, खिडक्यांच्या काचा गहाळ आहेत आणि पावसात आत पाणी गळते. त्यामुळे विद्यार्थिनींना बसण्यासाठी आणि उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही.

सकाळी आणि दुपारी शाळेच्या वेळी गर्दी वाढते. मात्र एकच बस असल्याने अनेक विद्यार्थिनींना बस न मिळाल्याने उशीर होतो किंवा खाजगी वाहनाने महागड्या दराने जावे लागते. शनिवारी सकाळी बस पुन्हा मध्येच बंद पडल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी बसस्थानकावरच ठिय्या मांडला. आम्हाला शिक्षणासाठी सुरक्षित आणि चांगली वाहतूक हवी आहे. ही भंगार बस बंद करा आणि नवीन बस द्या,अशी घोषणाबाजी विद्यार्थिनींनी केली.

त्यांनी मानव विकास महामंडळाकडे लेखी निवेदनही दिले. त्यात सिरसम बु. मार्गावर किमान २ बस सुरू कराव्यात आणि सध्याची खराब बस तातडीने बदलून नवीन बस पाठवावी अशी मागणी  विद्यार्थीनीने केली आहे. पालकांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. रोज बस बंद पडली तर मुलींना रस्त्यात अडचण होत असल्याचे पालक सांगत आहेत  मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थिनींनीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आदीवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गजानन ढाकरे यांनी दिला आहे दिला आहे.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026