एसटी एनसीएमसी कार्ड

एस.टी.च्या एनसीएमसी कार्डला 'तांत्रिक अडचणीं'चा ब्रेक; प्रवासी संघटनांचा विरोध

ST NCMC Card: एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी (NCMC) कार्ड प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असली, तरी ग्रामीण भागात या प्रणालीला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना

एस.टी.च्या एनसीएमसी कार्डला 'तांत्रिक अडचणीं'चा ब्रेक; प्रवासी संघटनांचा विरोध

ST NCMC Card

 

टॉप अप सुविधा मिळेना; सॉफ्टवेअर सुरळीत चालेना!

लातूर (ST NCMC Card) : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी (NCMC) कार्ड प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली असली, तरी ग्रामीण भागात या प्रणालीला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जोपर्यंत एनसीएमसी (NCMC) कार्ड प्रणाली, टॉप-अप सुविधा आणि संबंधित सॉफ्टवेअर सुरळीतपणे कार्यरत होत नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे ओळखपत्राच्या आधारे सवलतीची तिकिटे देण्याची पद्धत सुरू ठेवावी, अशी जोरदार मागणी महिला, ज्येष्ठ नागरिक संघटना तसेच प्रवासी वर्गातून होत आहे.

एमसीएमसी (NCMC) कार्ड सक्तीमुळे (ST NCMC Card) अनेक प्रवाशांचे कार्ड अद्याप अॅक्टिव्ह झालेले नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच कार्ड रिचार्ज करताना प्रवाशांना अडचणी येत असून, ग्रामीण भागातील अनेक बसस्थानके व आगारांमध्ये कार्ड टॉप-अप करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ई-तिकीट मशीन वारंवार हँग होणे, नेटवर्क उपलब्ध नसणे तसेच तांत्रिक अडचणींमुळे वाहकांनाही मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना एनसीएमसी कार्डची सक्ती नेमकी कोणत्या तारखेपासून लागू झाली, कार्ड कसे वापरायचे आणि त्याचे रिचार्ज कसे करायचे, याबाबत पुरेशी माहिती मिळालेली नाही. परिणामी सवलतीच्या प्रवासासाठी बसमध्ये चढल्यानंतर कार्डशी संबंधित अडचणी निर्माण झाल्यास प्रवासी आणि वाहक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, १ सप्टेंबरपासून एमसीएनसी कार्ड (ST NCMC Card) ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा सुरू करण्यात आली असून, फोन पे, गुगल पे (PhonePe, Google Pay) तसेच इतर डिजिटल माध्यमांतून कार्ड रिचार्ज करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सवलतधारक प्रवाशांना आपल्या खात्यावरून स्वतःचे कार्ड रिचार्ज करण्यासाठीही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र या सुविधेबाबत ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये पुरेशी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पायाभूत सुविधा व नेटवर्क व्यवस्था सक्षम हवी!
डिजिटल प्रणालीचा उद्देश प्रवाशांना अधिक सुलभ व पारदर्शक सेवा देणे हा असला, तरी पायाभूत सुविधा आणि नेटवर्क व्यवस्था सक्षम करण्यापूर्वी एनसीएमसी कार्डची सक्ती केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवर रिचार्जची सुविधा उपलब्ध करावी, तसेच प्रवाशांना कार्ड वापराबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

तांत्रिक गोंधळ तातडीने दूर न झाल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक व प्रवासी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रवासी वर्गातून देण्यात आला आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एनसीएमसी कार्ड प्रणालीबाबत नियम शिथिल करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

टैग्स: ST NCMC Card

संबंधित सामग्री

महिला आणि ज्येष्ठांच्या एसटी सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती अखेर लांबणीवर

महिला आणि ज्येष्ठांच्या एसटी सवलतीसाठी NCMC कार्डची सक्ती अखेर लांबणीवर

ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला आहे. यापूर्वी १ सप्टेंबर २०२६ पासून NCMC कार्ड

Sep 02, 2026
एसटीचे संपूर्ण भाडे भरून लाडकी बहीण सासरी!

एसटीचे संपूर्ण भाडे भरून लाडकी बहीण सासरी!

ST NCMC Card: महामंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. यात महिला व वृद्धांना प्रवासाची सवलत हवी असेल तर 'एन सी एम सी' कार्ड असणे अनिवार्य आहे. जर हे कार्ड नसेल तर बसच्या प्रवासामध्ये मिळणारी सवलत

Sep 01, 2026
उद्या १ सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य, एसटी महामंडळाचे आदेश जारी

उद्या १ सप्टेंबर पासून NCMC कार्ड अनिवार्य, एसटी महामंडळाचे आदेश जारी

ST NCMC Card: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सवलतीच्या प्रवासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दि. १ सप्टेंबर २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना सवलत

Aug 31, 2026