Special Intensive Revision

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; २७ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध

 भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमात सुधारणा करून सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; २७ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध

Special Intensive Revision

हिंगोली : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमात सुधारणा करून सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख धरून हा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येणार असून आयोगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांना यासंदर्भात लेखी सूचना पाठवली आहे.

यापूर्वी १४ मे २०२६ आणि १५ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशांनंतर तसेच राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या विनंतीनुसार आयोगाने हे नवीन वेळापत्रक मंजूर केले आहे.

आयोगाच्या माहितीनुसार, मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला ३० जून २०२६ पासून सुरुवात झाली आहे. याअंतर्गत बीएलओ (Booth Level Officer - BLO) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासणी व पडताळणी करणार आहेत. ही प्रक्रिया १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. याच दिवशी मतदान केंद्रांचे युक्तीकरण तसेच आवश्यक असल्यास मतदान केंद्रांचे स्थलांतर करण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात येणार आहे.

मतदार यादीचा मसुदा २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल. मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना आपली नावे तपासता येतील. तसेच काही त्रुटी अथवा बदल असल्यास दावे आणि हरकती नोंदविण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे.

या कालावधीत प्राप्त होणाऱ्या सर्व दावे आणि हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्याची प्रक्रिया २४ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित मतदारांना लेखी सूचना देणे तसेच त्यांची बाजू ऐकून घेण्याचाही समावेश असेल.

या संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, हीच यादी पुढील निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.

आयोगाने मुख्य निवडणूक अधिकारी यांना सुधारित कार्यक्रमाची माहिती राज्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करून सामान्य मतदारांपर्यंत माहिती पोहोचविण्याबरोबरच राज्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात माहिती देऊन सहकार्य करण्यास सांगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हा आदेश आयोगाचे उपसचिव संदीप कुमार यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करून पारदर्शक आणि अद्ययावत मतदार यादी तयार करणे, हा या विशेष सघन पुनरिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या तारखा

  • ३० जून २०२६ – विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेला प्रारंभ
  • १७ ऑगस्ट २०२६ – बीएलओ पडताळणी व मतदान केंद्र युक्तीकरण पूर्ण
  • २४ ऑगस्ट २०२६ – मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध
  • २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ – दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी
  • २२ ऑक्टोबर २०२६ – दावे व हरकतींचा अंतिम निपटारा
  • २७ ऑक्टोबर २०२६ – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026