Shrenik Lodha

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची आमदार तानाजी मुटकुळे यांनी घेतली सदिच्छा भेट

हिंगोली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांची आमदार तानाजी मुटकुळे यांनी घेतली सदिच्छा भेट

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी नूतन पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

या सदिच्छा भेटीदरम्यान आमदार तानाजी मुटकुळे आणि पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्यात हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याबाबत चर्चा झाली. तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि गुन्हेगारीमुक्त हिंगोली घडवण्यासाठी लोकप्रतिनिधी व पोलीस दल यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते के. के. शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा सरचिटणीस उमेश नागरे, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, सभापती माणीक लोडे, सदाशिव सुर्यतळ, संदीप वाकडे, ॲड. पठाडे, नितीन राठोड, कैलाश बुळे आणि गुड्डू देवकते उपस्थित होते.

संबंधित सामग्री

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026